Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-११७)
महापुराण
(३५७
तद्रूपालोकनोच्चक्षुस्तद्गात्रस्पर्शनोत्सुकः । तन्मुखामोदमाज्जिघ्रन् रसयंश्चासकृन्मुखम् ॥ ११० तद्गेयकालनिक्वाणश्रुतिसंसक्तकर्णकः । तद्गात्रविपुलारामे स रेमे सुखनिर्वृतः ॥ १११ पञ्चबाणाननङ्गस्य वदन्त्येतानकुण्ठितान् । पुष्पेषुसथा लोके प्रसिद्धयेव गता प्रथाम् ॥ ११२ धनुर्लता मनोजस्य प्राहुःपुष्पमयों जडाः । सुकुमारतरं स्त्रणं वपुरेवातनोधनः ॥ ११३ पञ्चबाणाननङ्गस्य नियच्छंति कुतो जडाः । यदेव कामिनां हारि तदस्त्रकामदीपनम् ॥ ११४ स्मितमालोकितं हासो जल्पितं मदमन्मनम् । कामाङ्गमिदमेवान्यकतवं तस्य पोषकम् ॥ ११५ आरूढयौवनोष्माणौ स्तनावस्था हिमागमे । रोम्णां हृषितमस्याडगे शिशिरोत्थं विनिन्यतुः॥११६ हिमानिलैः कुचोत्कम्पमाहितं साहतक्लमः । प्रेयस्तलकरस्पर्शेरपनिन्येऽङ्कशायिनी ॥ ११७
भरत चक्रवर्ती तिचे रूप डोळे न मिटवता सारखे पाहत असे. तिच्या शरीराला स्पर्श करण्यात नेहमी भरत उत्सुक होत असे. तिच्या मुखाचा सुगंध तो नेहमी हुंगत असे आणि तिच्या मुखाचे तो वारंवार चुम्बन घेत असे ॥ ११० ॥
तिच्या गाण्यात जो मधुर ध्वनि तो ऐकण्यात त्याचे कान नेहमी आसक्त होत असत. तो चक्री नेहमी तिच्या शरीररूपी विस्तृत बगीचात रमत असे व त्या सुखानी तो कृतार्थ झाला ॥ १११ ।।
मदनाचे पाच बाण सर्वत्र अकुंठित आहेत असे सर्व लोक म्हणतात व मदनाचे बाण फुलांचे आहेत अशी कथा लोकात पुष्प बाण या नावाने प्रसिद्ध झाली आहे ॥ ११२ ।।
मदनाचे धनुष्य फुलानी बनलेले आहे असे अज्ञ लोक म्हणतात. पण खरे पाहिले असता अधिक कोमल असलेले जे स्त्रीशरीर तेच मदनाचे धनुष्य होय ॥ ११३ ॥
मदनाचे बाण पाचच आहेत आहेत असे मूर्खलोक कसे निश्चित करतात? वास्तविक पाहिले असता कामिजनांच्या मनाला जे जे आकर्षिते ते ते सर्व कामोत्तेजक मदनाचे शस्त्र होय ॥ ११४ ॥
सुंदर स्त्रीचे मंद हास्य, वक्र दृष्टीने पाहणे, स्पष्ट हसणे आणि तारुण्यमदाने अस्पष्ट असे बोलणे हे सर्व मदनोत्पत्तीची साधने आहेत पण बाकीचे कपट व्यापार त्याचेच पोषक आहेत ॥ ११५ ॥
तारुण्याची उष्णता ज्यात उत्पन्न झाली आहे असे या सुभद्रादेवीच्या दोन स्तनानी हिवाळ्यात या चक्रवर्तीच्या अंगात थंडीमुळे उत्पन्न झालेले जे रोमांच ते नाहीसे केले ।। ११६ ॥
पति भरताच्या मांडीवर झोपणाऱ्या सुभद्रादेवीने थंड वान्यानी उत्पन्न झालेल्या स्तनांच्या कंगाला क्लेश हरण करणाऱ्या आपल्या पतीच्या हाताच्या स्पर्शानी नाहीसे केले ॥ ११७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org