Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४०)
महापुराण
(३६-१८७
केवलार्कोदयात्प्राक्च पश्चाच्च विधिवव्यधात् । सपर्या भरताधीशो योगिनोऽस्य प्रसन्नधीः॥१८७ स्वागःप्रमार्जनार्थेज्या प्राक्तनी भरतेशिनः । पाश्चात्यात्यायताऽपीज्या केवलोत्पत्तिमन्वभूत् ॥ या कृता भरतेशेन महेज्या स्वानुजन्मनः । प्राप्तकेवलबोधस्य को हि तवर्णने क्षमः ॥१८९ स्वाजन्यानुगमोऽस्त्येको धर्मरागस्तथापरः । जन्मान्तरानुबन्धश्च प्रेमबन्धोऽतिनिर्भरः ॥ १९० इत्येकशोऽप्यमी भक्तिप्रकर्षस्य प्रयोजकाः । तेषां तु सर्वसामग्री कां न पुष्णाति सक्रियाम् ॥१९१ सामात्यः समहीपालः सान्तःपुरपुरोहितः । तं बाहुबलियोगीन्द्रं प्रणनामाधिराट् मुदा ॥ १९२ किमत्र बहुना रत्नैः कृतोऽर्घः स्वर्णदीजलम् । पाद्यं रत्नाचिषो दीपास्तण्डुलेज्या च मौक्तिकैः ॥ हविः पीयूषपिण्डेन धूपो देवद्रुमांशकः । पुष्पार्चा पारिजातादिसुरागसुमनश्चयः ॥ १९४ सरत्ना निधयः सर्वे फलस्थाने नियोजिताः। पूजां रत्नमयीमित्थं रत्नेशो निरवर्तयत् ॥ १९५
___ केवलज्ञानरूपी सूर्योदयाच्या पूर्वी आणि केवलज्ञान उत्पन्न झाल्यावर या बाहुबलियोगिराजाची प्रसन्न बुद्धीने भरतपतीने विधीप्रमाणे पूजा केली ।। १८७ ।।
___भरतेश्वराने प्रथम जी पूजा केली ती स्वतःच्या अपराधाच्या क्षालनासाठी केली होती व नन्तर मागाहून जी फार मोठी पूजा योगिराजाची केली होती. ती केवलज्ञानानन्तर झाली ॥ १८८॥
ज्याला केवलज्ञानाची प्राप्ति झाली आहे अशा आपल्या भावाची या भरतचक्रीने जी फार मोठी पूजा केली तिचे वर्णन करण्यास कोण बरे समर्थ आहे ? ॥ १८९ ।
बाहुबली भरताचे स्वजन होते- धाकटे भाऊ होते हे त्यांची पूजा करण्याचे पहिले कारण, दुसरे कारण धर्मावर उत्कट प्रेम, तिसरे कारण अनेक पूर्वजन्मापासूनचे संबंध व चौथे कारण अतिशय गाढ असे बाहुबलीवरचे प्रेम. यापैकी एकेक देखिल भक्तिप्रकर्षाच्या उत्पत्तीचे कारण आहे. मग या सर्वकारणांची सामग्री प्राप्त झाल्यावर ती कोणत्या श्रेष्ठ कार्याला पुष्ट करणार नाही बरे ? ॥ १९०-१९१ ॥
त्या भरतचक्रेश्वराने आपले प्रधान, आपल्या अधीन असलेले राजे, आपले अन्तःपूर व आपला पुरोहित या सर्वाना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने बाहुबली योगीन्द्राला अतिशय नम्र पणाने वंदन केले ।। १९२ ॥
___ या पूजेविषयी अधिक वर्णन करण्याची आवश्यकता नाही. या भरतेश्वराने रत्नानी अर्घ्य अर्पण केला. गंगानदीचे पाणी त्या बाहुबलीच्या चरणक्षालनास भरतेश्वराने उपयोगात आणले. रत्नांच्या कान्तीनी त्याने दीपपूजा केली व मोत्यांचे समूह हे तांदूळ त्यानी अक्षत पूजा केली. अमृताच्या पिण्डाने नैवेद्य अर्पण केला. देवदारुवृक्षांच्या चूर्णाने-कल्पवृक्षांच्या चूर्णाने धूपपूजा केली व पारिजात आदिक कल्पवृक्षांच्या पुष्पसमूहानी त्याने पुष्पपूजन केले. रत्नासहित नवनिधि त्याने फलपूजेसाठी उपयोगात आणले. यांप्रमाणे चौदा रत्नांचा अधिपति अशा भरतेशाने ही रत्नमय पूजा बाहुबलींच्या चरणांची केली ॥ १९३-१९५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org