Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४८)
महापुराण
(३७-३३
तावन्त्येव सहस्राणि देशानां सुनिवेशिनाम् । यरलस्कृतमाभाति चक्रभृत्क्षेत्रमायतम् ॥ ३३ कुलजात्यभिसम्पन्नाः देव्यस्तावत्प्रमाः स्मृताः । रूपलावण्यकान्तीनां याः शुद्धाकरभूमयः ॥ ३४ म्लेच्छराजादिभिर्दत्तास्तावन्त्यो नृपवल्लभाः। अप्सरःसङ्कथाः क्षोणी यकाभिरवतारिताः ॥ ३५ अवरुद्धाश्च तावन्त्यस्तन्व्यः कोमलविग्रहाः । मदनोद्दीपनैर्यासां दृष्टिबाजितं जगत् ॥ ३६ . नरवांशुकुसुमो दैरारक्तैः पाणिपल्लवः । तास्तन्व्यो भुजशाखाभिर्भेजः कल्पलताश्रियम् ॥ ३७ स्तनाब्जकुड्मलेरास्यपङ्कजैश्च विकासिभिः । अब्जिन्य इव ता रेजुर्मदनावासभूमिकाः ॥ ३८ मन्ये पात्राणि गात्राणि तास्तं कामग्रहोच्छितौ । यदावेशवशादेष दशां प्राप्तोऽतिवतिनीम् ॥ ३९ शङ्के निशानपाषाणान्नखानासां मनोभवः । यत्रोपारूढतैक्षण्यैः स्वरविध्यत्कामिनः शरैः॥ ४०
ज्याची रचना उत्तम आहे अशा बत्तीस हजार देशानी अलंकृत झालेले या चक्रवर्तीचे हे विशाल क्षेत्र भारतवर्ष शोभत होते ॥ ३३ ॥
__ या चक्रवर्तीला उत्तम कुल आणि उत्तम जातीच्या अशा पट्टराण्याही तितक्याच म्हणजे बत्तीस हजार होत्या. या रूप-आकृति, सौंदर्य आणि कान्ति यांच्या जणु निर्दोष उत्कृष्ट खाणी अशा होत्या ॥ ३४ ।।
या चक्रवर्तीला पाच म्लेच्छ खंडांचे जे राजे आदिकानी आपल्या कन्या अर्पण केल्या त्यानी अप्सरांची कथा या भूमीवर आणिली होती. अर्थात् त्या अप्सराप्रमाणे सुंदर होत्या. अशा त्या नृपवल्लभा राण्याही बत्तीस हजार होत्या ॥ ३५ ॥
___ मदनाला उद्दीपित करणाऱ्या आपल्या दृष्टिबाणानी ज्यानी जगत् जिंकले आहे व ज्यांचे कोमलशरीर आहे अशा बत्तीस हजार राण्या अन्तःपुरामध्ये आणखी होत्या. त्याना 'अवरुद्धा' म्हणतात. मिळून या सर्व राण्या शहाण्णव हजार होत्या ॥ ३६ ।।
त्या नाजूक व सुन्दर स्त्रिया नखांच्या किरणरूपी पुष्पांच्या विकासानी व थोडेसे लाल अशा हस्तरूपी कोमल पालवीनी युक्त अशा बहुरूपी शाखानी, फांद्यानी जणु युक्त अशा कल्पलतेच्या शोभेला धारण करू लागल्या ।। ३७ ॥
मदनाचे निवासस्थान असलेल्या त्या सुन्दर स्त्रिया स्तनरूपी कमलकलिकानी व मुखरूपी विकसित कमलानी जणु कमलिनीलताप्रमाणे शोभू लागल्या ॥ ३८ ।।
त्या सुंदर स्त्रियांची शरीरे, मदनरूपी पिशाचाचे लोकांच्या अंगात शिरण्याचे जणु स्थानच आहे असे वाटते. कारण त्याच्या आवेशाच्या वश होऊन हा भरतेश्वर विमर्याद दशेला (अत्यन्त विषयासक्तीला) प्राप्त झाला ॥ ३९ ॥
मला असे वाटते की त्या राण्यांची नखे बाण तीक्ष्ण करण्याचे पाषाण असावेत. कारण मदन आपले बाण त्या नखरूपी पाषाणावर तीक्ष्ण करून त्या आपल्या बाणानी कामीजनाना विद्ध करीत असे ॥ ४० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org