Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-३२)
महापुराण
(३४७
विव्यरत्नविनिर्माणा रथास्तावन्त एव हि । मनोवायुजवाः सूर्यरथप्रस्पद्धिरंसः ॥ २४ कोटयोऽष्टादशाश्वानां भूजलाम्बरचारिणाम् । यत्खुराग्राणि धौतानि पूर्तस्त्रिपथगाजलैः ॥ २५ चतुभिरधिकाशीतिः कोटयोऽस्य पदातयः । येषां सुभटसंमर्दे निरूढं पुरुषव्रतम् ॥ २६ वज्रास्थिबन्धननिर्वलयर्वेष्टितं वपुः । वज्रनारानिभिन्नमभेद्यमभवत्प्रभोः॥ २७ समसुप्रविभक्ताङ्गं चतुरस्रं सुसंहति । वपुः सुन्दरमस्यासीत्संस्थानेनादिना विभोः ॥ २८ निष्टप्तकनकच्छायं सच्चतुःषष्टिलक्षणम् । रुरुचे व्यञ्जनस्तस्य निसर्गसुभगं वपुः ॥ २९ शारीरं यच्च यावच्च बलं षट्खण्डभूभुजाम् । ततोऽधिकतरं तस्य बलमासीबलीयसः॥ ३० शासनं तस्य चक्रामासिन्धोरनिवारितम् । शिरोभिरूढमारूढविक्रमः पृथिवीश्वरैः ॥ ३१ द्वात्रिंशन्मौलिबद्धानां सहस्राणि महीक्षिताम् । कुलाचलैरिवादीन्द्रः स रेजे यैः परिष्कृतः ॥ ३२
ज्याची रचना दिव्य रत्नांनी केली आहे व जे मनाप्रमाणे व वायुप्रमाणे वेगवान आहेत व सूर्यरथाशी स्पर्धा करणारा वेग ज्यांचा आहे असे चौयाऐंशी लक्ष रथ या भरतराजाचे आहेत ॥ २४ ।।
ज्याच्या खुरांचे अग्रभाग गंगानदीच्या पवित्र पाण्यानी धुतले आहेत व जे जमीन, पाणी आणि आकाशातून धावतात असे चक्रीचे घोडे अठरा कोटी होते ॥ २५ ॥
ज्यांचा पराक्रम शूर योद्धयाबरोबर लढण्यात सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे असे या चक्रीचे पायदल सैन्य चौऱ्याऐंशी कोटी होते ॥ २६ ॥
___ या चक्रवर्तीचे शरीर वज्राप्रमाणे कठिण अशा हाडांच्या बंधनानी व वज्राच्याच वेष्टनानी वेष्टित होते आणि वज्राच्या खिळयानी चांगले मजबूत असे बनले होते. व ते अभेद्य केव्हाही न मोडणारे होते. अर्थात् याचे शरीर वज्रवृषभनाराच या पहिल्या संहनननाम कर्माच्या उदयाने बनलेले होते ।। २७ ।।
या प्रभूचे शरीर चतुरस्र होते म्हणजे चारी बाजूनी सुंदर होते. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रमाणबद्ध होता व सुन्दर होता. पहिल्या चतुरस्रसंस्थान नामकर्माच्या उदयाने याचे शरीर बिलकुल प्रमाणबद्ध बनलेले होते ॥ २८ ॥
त्याच्या शरीराची कांति तापविलेल्या सोन्याप्रमाणे होती व त्या शरीरावर चौसष्ट लक्षणे होती. तिळ वगैरे व्यंजनानी स्वाभाविक फार सुंदर दिसत होते ॥ २९ ॥
भरतक्षेत्रातील षट्खंडाच्या राजेलोकांच्या शरीरामध्ये जेवढे बल होते त्यापेक्षा अधिक बल त्या बलवान् भरतचक्रीच्या शरीरात होते ॥ ३० ॥
चक्रचिह्नाने शोभणारे त्याचे शासन समुद्रापर्यन्त अनिवार्य असे होते. व सर्व पराक्रमी राजानी ते आपल्या मस्तकानी धारण केले होते ।। ३१ ।।।
हिमवान् वगैरे कुलपर्वतानी वेढलेला व मध्यभागी असलेला मेरुपर्वत जसा शोभतो तसे मुकुटबद्ध अशा बत्तीस हजार राजानी सेविलेला हा चक्रवर्ती भरत शोभत असे ॥ ३२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org