Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-१५)
महापुराण
(३४५
मूर्धाभिषिक्तैः प्राप्ताभिषेकस्यास्याजनि द्युतिः । मेराविवाभिषिक्तस्य नाकीन्द्ररादिवेधसः ॥९ गंगासिन्धू सरिद्देव्यौ साक्षतैस्तीर्थवारिभिः । अभ्योक्षिष्टां तमभ्येत्य रत्नभृङ्गारसम्भृतैः॥ १० कृताभिषेकमेनं च नृपासनमषिष्ठितम् । गणबद्धामरा भेजुः प्रणम्रर्मणिमौलिभिः ॥ ११ । हिमवद्विजया शौ मागधाद्याश्च देवताः। खेचराश्चोभयश्रेण्योस्तं नेमुर्नम्रमौलयः ॥ १२ सोभिषिक्तोऽपि नोसिक्तो बभूव नृपसत्तमैः । महतां हि मनोवृत्ति!त्सेकपरिरम्भिणी ॥ १३ 'चामर:ज्यमानोऽपि न निर्वृतिमगाद्विभुः । भ्रातृष्वसंविभक्ता श्रीरितीहानुशयानुगः ॥ १४ दोर्बलिभ्रातृसङ्घर्षान्नास्य तेजो विकर्षितम् । प्रत्युतोत्कर्षि हेम्नो वा घृष्टस्य निकषोपले ॥ १५
मेरुपर्वतावर स्वर्गातील इंद्रानी आदिभगवंताचा अभिषेक केला होता व त्यावेळी जशी आदिभगवंताच्या ठिकाणी कान्ति उत्पन्न झाली होती तशी राजानी जेव्हा भरतचक्रीचा राज्याभिषेक केला तेव्हा तशी कान्ति यालाही उत्पन्न झाली ।। ९ ॥
गंगा आणि सिंधु या दोन नदीदेवता चक्रवर्तीकडे आल्या व रत्नांच्या झारीमध्ये भरलेल्या व अक्षतानी सहित अशा अनेक तीर्थजलानी त्याचा त्यानी अभिषेक केला ॥ १० ॥
ज्याचा अभिषेक केला आहे व जो राजसिंहासनावर बसला आहे अशा या भरतेश्वराची गणबद्ध देव नम्र केलेल्या रत्नखचित मुकुटानी सेवा करू लागले. मस्तक नम्र करून ते देव त्याची सेवा करीत असत ।। ११॥
हिमवान् पर्वत व विजयार्धपर्वताचे स्वामी असे देव आणि मागधादि देव व विजयार्द्ध पर्वताच्या दोन्ही श्रेणीचे स्वामी असे विद्याधरराजे हे सर्व मस्तक नम्र करून चक्रवर्तीना नमस्कार करू लागले ॥ १२ ॥
श्रेष्ठ राजांनी ज्याचा राज्याभिषेक केला आहे असाही भरतचक्री गर्वाने फुगला नाही. बरोबरच आहे की जे मोठे लोक असतात त्यांची मनोवृत्ति गर्वाने आलिंगिलेली नसते म्हणजे त्यांना गर्वाचा स्पर्श होत नाही ॥ १३ ॥
तो भरतेश्वर चवऱ्यानी नेहमी वारला जात होता तथापि तो स्वतःला सुखी समजत नव्हता. कारण आपली सम्पत्ति भावामध्ये वाटली गेली नाही याचा त्याला फार पश्चात्ताप वाटत होता ॥ १४ ।।
आपल्या बाहुबली बंधूबरोबर झालेल्या युद्धाने या भरतेश्वराचे तेज कमी झाले असे नाही. उलट ते वाढलेच. कसोटीच्या दगडावर सोने घासले गेले असता त्याचे तेज कमी होते असे नाही. उलट त्याचे तेज वाढते ॥ १५ ॥
म. ४४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org