Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६-२१२)
महापुराण
३४३
शितिभिरलिकलाभराभुजं लम्बमानः । पिहितभुजविटङ्को मूर्धजर्वेल्लिताः ॥ जलधरपरिरोधध्याममूव भूध्रः । श्रियमपुषदनूनां दोर्बली यः स नोऽव्यात् ॥ २१० स जयति हिमकाले यो हिमानीपरीतम् । वपुरचल इवोच्चैबिभ्रदाविर्बभूव ॥ नवधनसलिलोधैर्यश्च धोतोऽब्दकाले । खरघृणिकिरणानप्युष्णकाले विषेहे ॥ २११ जगति जयिनमेनं योगिनं योगिवर्यैरधिगतमहिमानं मानितं माननीयः । स्मरति हृदि नितान्तं यः स शान्तान्तरात्मा । भजति विजयलक्ष्मीमाशु जैनीमजय्याम् ॥२१२
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे भुजबलिजलमल्लदृष्टियुद्धविजयदीक्षाकेवलोत्पत्तिवर्णनं नाम षट्त्रिंशत्तमं पर्व ॥३६॥
मस्तकापासून बाहूपर्यंत लोंबणारे व ज्यांनी बाहूंचा अग्रभाग झाकला आहे, ज्यांचे अग्रभाग वाकडे झाले आहेत. भुंग्याप्रमाणे ज्यांची कान्ति आहे अशा काळ्या केशांनी युक्त असल्यामुळे मेघांनी घेरल्यामुळे ज्याचे मस्तक शिखर काळे दिसत आहे अशा पर्वताप्रमाणे जो शोभेला पुष्ट करीत आहे असा भुजबलिमुनिराज आमचे रक्षण करो ॥ २१० ॥
हिवाळ्यात जो हिमानी-बर्फानी व्याप्त झालेले आहे शरीर ज्याचे असा असूनही उंच पर्वताप्रमाणे ज्याने आपले शरीर निश्चल धारण केले आहे म्हणजे ज्याचे शरीर थंडीने थरथर कापत नाही आणि पावसाळयात नवीन मेघांच्या पाण्याच्या वृष्टींनी जो धुतला गेला आहे व उन्हाळ्यात तीक्ष्ण किरण ज्याचे आहेत अशा सूर्याच्या किरणांना ज्याने सहन केले आहे तो महामुनि बाहुबलि विजयी आहे ॥ २११ ।।
श्रेष्ठ योगिजनांनी ज्याचा महिमा गायिला आहे, आदरणीय मुनिजनांनी ज्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले आहे व जो जगात विजयी म्हणून प्रसिद्ध आहे. अशा या भुजबलि महायोग्याला जो आपल्या हृदयात नित्य स्मरतो, त्याच्या आत्म्याला शांति प्राप्त होते व तो शीघ्र जिला कोणी जिंकू शकत नाही अशा विजयलक्ष्मीला-मोक्षलक्ष्मीला मिळवितो ।। २१२ ॥
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्ष-त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादात बाहुबलीला जलयुद्ध, मल्लयुद्ध आणि दृष्टियुद्धात विजय प्राप्त झाला यानंतर त्यांनी दीक्षा घेऊन केवलज्ञान प्राप्त करून घेतले याचे वर्णन करणारे छत्तीसावे पर्व समाप्त झाले ॥ ३६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org