________________
३६-२०४)
महापुराण
(३४१
सुराश्चासनकम्पेन ज्ञाततत्केवलोदयाः । चक्रुरस्य परामिज्यां शताध्वरपुरःसराः ॥ १९६ वर्मन्दं स्वरुद्यानतरुधूननचञ्चवः । तदा सुगन्धयो वाताः स्वधुनीशीकराहराः ॥ १९७ मन्द्रं पयोमुचांमार्गे दध्वनुश्च सुरानकाः । पुष्पोत्करो दिवोऽपप्तत् कल्पानोकहसम्भवः ॥ १९८ रत्नातपत्रमस्योच्चनिमितं सुरशिल्पिभिः । पराय॑मणिनिर्माणमभादिव्यं च विष्टरम् ॥ १९९ स्वयं व्यधूयतास्योच्चैः प्रान्तयोश्चमरोत्करः । सभावनिश्च तद्योग्या पप्रथे प्रथितोदया ॥ २०० सुरैरिचितः प्राप्तकेवद्धिः स योगिराट् । व्यधुतन्मुनिभिर्जुष्टः शशीवोडुभिराश्रितः ॥ २०१ घातिकर्मक्षयोद्भूतामुद्वहन्परमेष्टिताम् । विजहार महीं कृत्स्नां सोऽभिगम्यः सुधाशिनाम् ॥ २०२ इत्थं स विश्वविद्विश्वं प्रोणयन्स्ववचोऽमृतः । कैलासमचलं प्रापत्पूतं सन्निधिना गुरोः ॥ २०३
सकलनृपसमाजे दृष्टिमल्लाम्बुयुद्धविजितभरतकोतिर्यःप्रववाज मुक्त्यै ॥ तृणमिव विगणय्य प्राज्यसाम्राज्यभारं। चरमतनुधराणामग्रणीः सोऽवताद्वः ॥ २०४
___ आसने कम्पित झाल्यामुळे श्रीबाहुबलि मुनिवर्याला केवलज्ञान झाले आहे असे देवाना समजले व ते इन्द्रासह आले व त्यांनी त्यांची उत्कृष्ट पूजा केली ॥ १९६ ।।
स्वर्गातील उद्यानांच्या वृक्षाना हालविण्यात निपुण असे वारे मन्द मन्द वाहू लागले व त्या सुगंधी वायानी स्वर्गीय नद्यांच्या कणाना हरण करून आणिले होते ॥ १९७ ।।
मेघांच्या मार्गात अर्थात आकाशात देवनगारे गंभीर शब्द करू लागले व कल्पवृक्षापासून उत्पन्न झालेला पुष्पसमूह स्वर्गातून पडू लागला ॥ १९८ ।।
देवांच्या कारागिरानी उंच रत्नांचे छत्र निर्मिले व अमूल्यरत्नानी ज्याची रचना केली आहे असे दिव्य सिंहासन बनविले ।। १९९ ॥
या भगवंताच्या दोन्ही बाजूना चामरांचा समूह आपोआप हालत होता. जिची उन्नति व ऐश्वर्यशोभा प्रसिद्ध आहे अशी या भगवंताना शोभणारी योग्य अशी गंधकुटीसभा तेव्हा देवानी निर्माण केली ॥ २० ॥
ज्याना केवलज्ञानाचे वैभव प्राप्त झाले आहे, अशा त्या योग्याची देवानी पूजा केली व चांदण्या जसा चन्द्राचा आश्रय घेतात तसे मुनिसमूहाने युक्त असे ते योगिराज गंधकुटीमध्ये शोभत होते ॥ २०१॥
ज्ञानावरणादि घातिकर्माचा क्षय झाल्यामुळे प्रकट झालेले परमेष्ठिपद धारण करणारे, देवानी पूज्य असे ते बाहुबली मुनिवर्य सर्व पृथ्वीवर विहार करू लागले ।। २०२ ॥
याप्रमाणे आपल्या वचनामृतानी विश्वाला आनंदित करणारे असे ते सर्वज्ञ बाहुबलि मुनिराज गुरु अशा आदिभगवंताच्या सांनिध्याने पवित्र झालेल्या कैलासपर्वतावर आले । २०३ ।।
सर्व राजांच्या सभेत दृष्टियुद्ध, मल्लयुद्ध व जलयुद्ध या तीन युद्धानी ज्यानी भरताची कीति जिंकिली व यानंतर ज्यानी उत्कृष्ट पुष्कळ असा साम्राज्यभार गवताप्रमाणे तुच्छ मानून मोक्षप्राप्तीसाठी जिनदीक्षा घेतली व जे मुक्ति प्राप्तीला कारण असे शेवटचे शरीर धारण करणान्यामध्ये श्रेष्ठ होते ते बाहुबलि मुनिराज तुमचे रक्षण करोत ।। २०४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org