________________
३६-१८६)
महापुराण
शान्तस्वनैर्नदन्ति स्म वनान्तेऽस्मिन् शकुन्तयः । घोषयन्त इवात्यन्तं शान्तमेतत्तपोवनम् ॥ १७८ तपोऽनुभावादस्यैवं प्रशान्तेऽस्मिन्वनाश्रमे । विनिपातः कुतोऽप्यासीत्कस्यापि न कथञ्चन ॥ १७९ महसास्य तपोयोगजृम्भितेन महीयसा । बभूवुर्हत हृद्ध्वान्तास्तिर्यञ्चोऽप्यनभिद्रुहः ॥ १८० गतिस्खलनतो ज्ञात्वा योगस्थं तं मुनीश्वरम् । असकृत्पूजयामासुरवतीर्य नभश्चराः ॥ १८१ महिम्नास्य तपोवीर्यजनितेनालघीयसा । मुहुरासन कम्पोऽभून्नतमुर्ध्ना सुषाशिनाम् ॥ १८२ विद्याधर्यः कदाचिच्च क्रीडाहेतोरुपागताः । वल्लीरुद्वेष्टयामासुर्मुनेः सर्वाङ्गसङ्गिनीः ॥ १८३ इत्युपारूढसद्धयानबलोद्भूततपोबलः । स लेश्याशुद्धिमास्कन्दन्शुक्लध्यानोन्मुखोऽभवत् ।। १८४ वत्सरानशनस्यान्ते भरतेशेन पूजितः । स भेजे परमज्योतिः केवलाख्यं यदक्षरम् ॥ १८५ सक्लिष्टो भरताधीशः सोऽस्मत्त इति यत्किल । हृद्यस्य हादं तेनासीत्तत्पूजापेक्षिकेवलम् ॥ १८६
या वनाच्या मध्यभागी पक्षी शान्त शब्दानी किलबिल करीत आहेत. जणु ते हे तपोवन अत्यन्त शान्त आहे अशी घोषणा करीत आहेत असे वाटते ॥ १७८ ॥
( ३३९.
तपाच्या प्रभावाने हा वनाश्रम याप्रमाणे अतिशय शान्त आहे व येथे कोणाचाही व कसल्याही प्रकारचा उपद्रव होत नाही ।। १७९ ॥
या मुनिराजाच्या तपोयोगाने वृद्धिंगत झालेल्या मोठ्या तेजाने येथील तिर्यंच पशुपक्षीही त्यांच्या हृदयातील अंधार अज्ञान नाहीसा झाला असल्यामुळे वैररहित झाले आहेत ॥ १८० ॥
विद्याधर आपल्या गमनास प्रतिबंध झाल्यामुळे येथें आत्मध्यानात लवलीन झालेले मुनीश्वर आहेत हे जाणून व वारंवार उतरून त्यांची पूजा करीत असत ।। १८१ ।।
तपश्चरणाच्या सामर्थ्याने फार मोठा प्रभाव या मुनिवर्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला असल्यामुळे ज्यांची मस्तके नम्र झाली आहेत अशा देवांचे वारंवार आसनकम्प होत असत ।। १८२ ॥
केव्हा केव्हा क्रीडा करण्यासाठी या वनात विद्याधरी येत असत व या मुनीश्वराच्या सर्व अंगाना लपेटलेल्या वेली त्या काढून दूर करीत असत ।। १८३ ॥
याप्रमाणे धारण केलेल्या उत्तम ध्यानाच्या सामर्थ्याने ज्यांच्यामध्ये तपोबल प्रकट. झाले आहे असे हे मुनिवर्य लेश्यांची निर्मलता धारण करून शुक्लध्यानाकडे वळले || १८४ ॥
एक वर्षाच्या उपवासांची समाप्ति झाल्यावर भरतचक्रवर्तीने या बाहुबलि मुनिवर्यांची पूजा केली. त्यावेळी त्याना सर्व तत्त्वाना प्रकाशित करणारे व अविनाशी असे केवलज्ञान प्राप्त झाले ।। १८५ ।।
हा भरताधीश आमच्यापासून फारच पीडित झाला अशा अभिप्रायाचे बाहुबलीच्या मनात प्रेम होते म्हणून बाहुबलीचें केवलज्ञान त्याने भरताधीशानें पूजा करावी अशी अपेक्षा जणु करीत होते ॥ १८६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org