Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६-१६१)
महापुराण
( ३३७
afreturnवामुष्य ध्यानदीप्तौ निरीक्षिताः । क्षणं विशीर्णाः कर्माशा: कज्जलांशा इवाभितः ॥ तद्देहदीप्तिप्रसरो दिङ्मुखेषु परिस्फुरन् । तद्वनं गारुडग्रावच्छायाततमिवातनोत् ॥ १६३ तत्पदोपान्तविश्रान्ता विस्रब्धा मृगजातयः । बबाधिरे मृगैर्नान्यः क्रूररक्रूरतां श्रितैः ॥ १६४ विरोधिनोऽप्यमी मुक्तविरोधाः स्वरमासिताः । तस्योपाङग्रीभसिंहाद्याः शशंसुर्वैभवं मुनेः ।। १६५ जरज्जन्तुकमाघ्राय मस्तके व्याघ्रधेनुका । स्वभावनिविशेषं तमापोप्यत्स्तन्यमात्मनः ॥ १६६ करिणो हरिणाराती नन्वीयुः सह यूथपैः । स्तनपानोत्सुका भेजुः करिणीः सिंहपोतकाः ॥ १६७ कलभान्कलभाकार मुखरान्नखरैः खरैः । कण्ठीरवः स्पृशन्कण्ठे नाभ्यनन्दि न यूथपैः ॥ १६८ करिण्यो बिसिनी पत्रपुटैः पानीयमानयन् । तद्योगपीठपर्यन्तभुवः संमार्जनेच्छया ॥ १६९
श्यानरूपी जणु दिवटी तिच्या प्रकाशात कर्माचे अंश जणु काजळाच्या अंशाप्रमाणे तत्काल वर चोहोकडे निघून जात असल्याप्रमाणे दिसू लागले. अर्थात् धर्मध्यानाने कर्माचे अंश बाहुबलिमुनि राजापासून निघून जात आहेत असे दिसले ।। १६२ ॥
या मुनिराजाच्या शरीराच्या कान्तीचा समूह सर्व दिशामध्ये पसरून त्या वनाला जणु त्याने गारुडरत्नांच्या कान्तीनी व्याप्त केल्याप्रमाणे केले || १६३ ॥
त्या मुनिराजाच्या चरणाजवळ विश्रान्तीकरिता बसलेले अनेक प्रकारच्या हरिणादि प्राण्याना मातापित्याजवळ आपण बसलो आहोत असे वाटत असे कारण अन्य क्रूर प्राणी तेथे आले तरी ते त्या मुनीश्वराच्या प्रभावाने अक्रूर बनत असत व त्यांच्याकडून हरिणादिकाना बाधा पोहोचत नसे ॥ १६४ ॥
या मुनिराजाच्या चरणाजवळ हत्ती, सिंह, वाघ, गाय वगैरे परस्परविरोधी प्राणीदेखिल स्वच्छंदाने बसून वैररहित होत असत व त्यानी या मुनीश्वराचे वैभव ( प्रभाव ) व्यक्त केले ॥ १६५ ॥
नुकतीच प्रसवलेल्या वाघिणीने म्हशीच्या पिलाला बच्चाला त्याच्या मस्तकाला हुंगून आपल्या बच्च्याप्रमाणे त्याला मानले व तिने त्याला आपले दूध पाजले ॥ १६६ ॥
हत्ती आपल्या कळपाच्या मुख्य हत्तीसह सिंहाच्या मागोमाग जाऊ लागले व सिंहाचे बच्चे स्तनपान करण्यास उत्सुक होऊन हत्तिणीजवळ गेले ।। १६७ ।
बालपणाचे कोमल स्वर काढणाऱ्या हत्तीच्या बच्च्याना सिंह आपल्या तीक्ष्ण नखानी त्यांच्या कंठाजवळ जेव्हा स्पर्श करून खाजवू लागला तेव्हा कळपाच्या मुख्य हत्तीनी त्याचे अभिनंदन केले नाही असे नाही. अर्थात् त्याना मोठा आनंद वाटला ॥। १६८ ।।
त्या मुनिराजाच्या योगासनाच्या जवळची जमीन स्वच्छ करावी अशा इच्छेने हत्तिणीनी कमलिनीच्या पानांच्या द्रोणानी पाणी आणले ।। १६९ ॥
म. ४३
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org