Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६-१५५)
महापुराण
(३३५
तपसोग्रेण चोग्रोग्रतपसा चातिकर्शितः । स दीप्ततपसात्यन्तं दिदीपे दीप्तिमानिव ॥ १४९ सोऽतप्यत तपस्तप्तं तपो घोरं महच्च यत् । तथोत्तराण्यपि प्राप्तः समुत्कर्षाण्यनुक्रमात् ॥ १५० तपोभिरकृशैरेभिः स बभौ मुनिसत्तमः । घनोपरोधनिर्मुक्तः करैरिव गभस्तिमान् ॥ १५१ विक्रियाष्टतयी चित्रं प्रादुरासीत्तपोबलात् । विक्रियामखिलां हित्वा तीव्रमस्य तपस्यतः ॥१५२ प्रप्तौषधढेरस्यासीत्सन्निधिर्जगते हितः । आमर्शवेलजल्लाद्यैः प्राणिनामुपकारिणः ॥ १५३ अनाशुषोऽपि तस्यासीद्रसद्धिः शक्तिमात्रतः। तपोबलसमुद्भूता बद्धिरपि प्रप्रये ॥ १५४ अक्षीणावसथः सोऽभूत्तथाक्षीणमहानसः । सूते हि फलमक्षीणं तपोषणमुपासितम् ॥ १५५
---------------
ते महामुनि उग्र तपाने व अधिक उग्र उग्र अशा तपाने अतिशय कृश झाले पण दीप्त अशा तपाने सूर्याप्रमाणे ते अत्यन्त तेजस्वी झाले ॥ १४९ ।।
___ या महामुनीनी तापकारक असे तप आचरिले. तसेच घोरतप आणि महाघोर तप आचरले. तसेच आणखी अतिशय उत्कर्षशाली उत्तर तपेहि त्यानी क्रमाला अनुसरून आचरणात आणली ॥ १५० ॥
जसा मेघाच्या आवरणापासून मोकळा झालेला सूर्य किरणानी तेजस्वी दिसतो तसे ते बाहुबली महामुनि उत्कृष्ट अशा सर्व तपानी खूप शोभले ।। १५१ ॥
सर्व प्रकारची विक्रिया विकार त्यागून तीव्र तपश्चरण करणाऱ्या या मुनीश्वराना तपाच्या बलाने आठ प्रकारची विक्रिया प्राप्त झाली. हे आश्चर्यकारक घडले. भावार्थ-रागद्वेषादि विकाराना त्यागून तप करणाऱ्या या मुनीश्वराना अणिमा, महिमा, गरिवा व लघिमा प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ विक्रिद्धि प्राप्त झाल्या ॥ १५२ ।।
___ ज्याना औषध ऋद्धि प्राप्त झाली आहे व जे आमर्श-वांति, क्ष्वेल-थुकी व जल्ल-अंगाचा घाम वगैरेच्या द्वारे उपकार करतात अशा या मुनिराजाचे सानिध्य जगताच्या हिताला कारण होते. अशा मुनींच्या संनिध जे मुनि राहतात त्यांचे रोगादिक दूर होऊन त्यांचे कल्याण होते. असा भावार्थ समजावा ।। १५३ ॥
जरी ते आहार घेत नव्हते तथापि अचिन्त्य सामर्थ्याने रसऋद्धि प्राप्त झाली होती व तपोबलामुळे त्यांच्या ठिकाणी बलऋद्धि देखिल प्रकट झाली होती ॥ १५४ ।।
याचप्रमाणे ते महामुनि अक्षीणावसथऋद्धिधारक व अक्षीणमहानसत्रऋद्धिधारकही झाले होते. नेहमी अखंड तपश्चरण केले असता ते तप कधी न संपणाऱ्या फळाची प्राप्ति करून देते. जेथे अक्षीणावासऋद्धीचे धारक मुनि बसलेले असतात तेथे कितीही प्राणी येऊन बसले तरी कोणालाच अडचण वाटत नाही, सर्व सुखाने बसतात व अक्षीणमहानसऋद्धिधारक मुनि ज्या घरी आहार घेतात घरचे अन्न सगळ्या गावाला वाटले तरी ते सम्पत नाही ।। १५५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org