Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
( ३६-१५६
निर्द्वन्द्ववृत्तिरध्यात्ममिति निर्जित्य जित्वरः । ध्यानाभ्यासे मनश्चक्रे योगी योगविदांवरः ॥ १५६ क्षमामथोत्तमां भेजे परं मार्दवमार्जवम् । सत्यं शौचं तपस्त्यागावाकिञ्चन्यं च संयमम् ॥ १५७ ब्रह्मचर्यं च धर्म्यस्य ध्यानस्यैता हि भावनाः । योगसिद्धी परां सिद्धिमामनन्तीह योगिनः ॥ १५८ अनित्यात्राण संसारकत्वान्यत्वान्य त्वान्य शौचताम् । निर्जरास्त्रवसंरोधलोकस्थित्यनुचिन्तनम् ॥ धर्मस्वाख्याततां बोधिर्दुर्लभत्वं च लक्षयन् । सोऽनुप्रेक्षाविधि दध्यौ विशुद्धद्वादशात्मकम् ॥ १६० आज्ञापायौ विपाकं च संस्थानं चानुचिन्तयन् । स ध्यानमभजद्धम्यं कर्मांशान्परिशातयन् ॥ १६१
३३६)
रागद्वेषादिरहित अशी निर्विकल्पवृत्ति धारण करणे अर्थात् चित्ताला रागद्वेषरहित करणे यालाच अध्यात्म म्हणतात असा निश्चय करून योगाला जाणणाऱ्यामध्ये श्रेष्ठ व जितेन्द्रिय अशा त्या मुनिवर्याने मनाला जिंकून त्याला ध्यानाच्या अभ्यासात तत्पर केले ।। १५६ ।।
या मुनिराजानी उत्तम क्षमा- सहनशीलता, मार्दव - मानकषायाचा त्याग, आर्जव निष्कपटपणा, सत्य - खरे भाषण करणे, शौच निर्लोभ वृत्ति, तप- अनशनादि तप करणे, त्याग - दान देणे, आकिञ्चन्य निष्परिग्रहपणा, संयम - इन्द्रिये ताब्यात ठेवणे आणि ब्रह्मचर्य या धर्मध्यानाच्या दहा भावना आहेत. या जगात योगाची सिद्धि झाली म्हणजेच उत्कृष्ट सिद्धि-सफलता - मोक्षाची प्राप्ति होते असे योगी लोक मानतात ।। १५७-१५८ ।।
अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, आस्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधिदुर्लभ व धर्मस्वाख्यातता या बारा भावनांचे त्यानी विशुद्धचित्ताने चिन्तन केले होते. अनित्य- शरीर, धन वगैरे अनित्य आहे असे समजणे. अशरण- माझे रक्षण करणारा कोणी नाही असे चिंतन करणे, संसार- चतुर्गतीत फिरणे, एकत्व- मी एकटा आहे, पुत्रादिक कोणी भवान्तरी येत नाहीत असे चिन्तन, अन्यत्व, मी सर्वाहून भिन्न आहे असा विचार करणे, अशुचित्व- शरीर अपवित्र घाणेरडे आहे असे चिन्तन करणे, निर्जरा-बांधलेले कर्म कसे हळू हळू सडून जाईल याचा विचार करणे, आस्रव-जीवप्रदेशात कर्म कोणत्या कारणानी येतें याचा विचार करणे, संवर-कर्म कोणत्या उपायानी आत्म्यात येणार नाही त्या उपायाचा विचार, लोकस्थिति-जंग कसे आहे त्याची रचना कशी आहे याचा विचार करणे. धर्मस्वाख्यात-धर्मच संसारातून तारणारा आहे असा विचार करणे व त्याचे पालन करणे, बोधिदुर्लभता - रत्नत्रयाची प्राप्ति होणे दुर्लभ आहे असे चिन्तन करणे या बारा भावनांचे बाहुबलीमुनीनी निर्मल चिंतन केले होते ।। १५९ - १६० ॥
या मुनिराजानी आज्ञा, अपाय, विपाक आणि संस्थान यांचे चिन्तन करून व कर्माच्या अंशाना क्षीण करून धर्मध्यानाचा आश्रय केला. आज्ञाविचय- जिनेश्वरानी तत्त्वाचे स्वरूप अतिशय सूक्ष्म असे सांगितले आहे. त्यांची आज्ञाप्रमाण मानून त्या तत्त्वावर श्रद्धा ठेवणे, त्याचे चिन्तन करणे त्याला आज्ञाविचय धर्मध्यान म्हणतात. अपायविचय-मिथ्याज्ञानादिक हे जीवाला संसारात भ्रमण करण्यास कारण आहेत असा विचार करणे, विपाकविचय-कर्माच्या उदयादिकाचा विचार करणे हे तिसरे धर्मध्यान व संस्थानविचय-लोकाची रचना व त्यात असणारे पदार्थ यांचे स्वरूपचिंतन करणे हे चौथे धर्मध्यान होय ॥ १६१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org