Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३४)
महापुराण
(३६-१४२
मतिश्रुताभ्यां निःशेषमर्थतत्वं विचिन्वतः । करामलकवद्विश्वं तस्य विस्पष्टतामगात् ॥ १४२ परीषहजयैर्दीप्तो विजितेन्द्रियशात्रवः । कषायशत्रूनुच्छेद्य स तपोराज्यमन्वभूत् ॥ १४३ योगजाश्चर्द्धयस्तस्य प्रादुरासंस्तपोबलात् । यतोऽस्याविरभूच्छक्तिस्त्रैलोक्यक्षोभणं प्रति ॥ १४४ चतुर्भेदेऽपि बोधेऽस्य समुत्कर्षस्तदोदभूत् । तत्तवावरणीयानां क्षयोपशमभितः ॥ १४५ मतिज्ञानसमुत्कर्षात्कोष्ठबद्धचादयोऽभवन् । श्रुतज्ञाने च विश्वाङ्गपूर्व वित्त्वादिविस्तरः ॥ १४६ परमावधिमुल्लडच्य स सर्वावधिमासदत् । मनःपर्ययबोधं च सम्प्रापद्विपुलां मतिम् ॥ १४७ ज्ञानशुद्धचा तपःशुद्धिरस्यासीदतिरेकिणी । ज्ञानं हि तपसो मूलं यद्वन्मूलं महातरोः ॥ १४८
मतिज्ञान व श्रुतज्ञान या दोन ज्ञानांच्याद्वारे सर्व जीवादि पदार्थांच्या स्वरूपाचा विचार चिन्तन ते मुनिराज करीत असत व त्यावेळी हातातल्या आवळ्याप्रमाणे सर्व विश्व त्याना स्पष्ट झाले ॥ १४२ ।।
सर्व परीषहाना यानी जिंकिले होते यामुळे हे मुनिवर्य अतिशय प्रकाशयुक्त झाले होते, यानी कषायशत्रूना जिंकले होते, त्यामुळे क्रोधादिकषायांचा नाश करून उत्तम तपरूपी राज्याचा ते उपभोग घेऊ लागले ॥ १४३ ।।
त्याना तपाच्या सामर्थ्याने ध्यानापासून अनेक ऋद्धि प्राप्त झाल्या. त्यामुळे त्रैलोक्यात क्षोभ उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्याना प्राप्त झाले ॥ १४४ ।।
त्यांच्या मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान आणि मनःपर्ययज्ञान या चारी ज्ञानामध्ये चांगली उत्कृष्टता प्राप्त झाली होती. कारण त्या त्या मत्यादि चार ज्ञानावरणीय कर्मांचा क्षयोपशम खूप वाढला होता ।। १४५ ।।
- या महर्षीच्या ठिकाणी मतिज्ञानाचा अतिशय उत्कर्ष झाल्यामुळे कोष्ठबुद्धि, बीजबुद्धि आदिक ऋद्धि प्राप्त झाल्या आणि श्रुतज्ञानात आचारादि बारा अंगज्ञाने व उत्पादपूर्वादिक चौदा पूर्वांचे ज्ञान यांचा विस्तार याना प्राप्त झाला ॥ १४६ ॥
अवधिज्ञानाचे देशावधि, परमावधि आणि सर्वावधि असे तीन भेद आहेत त्यापैकी परमावधि ज्ञानाला उल्लंघून सर्वावधिज्ञानाची याना प्राप्ति झाली आणि मनःपर्यायज्ञानाचे ऋजुमति व विपुलमति असे दोन भेद आहेत त्यापैकी विपुलमति मन.पर्यायज्ञान याना प्राप्त झाले ॥ १४७ ॥
याप्रमाणे ज्ञानशुद्धि झाल्यामुळे तपश्चरणातही अतिशय निर्मलता प्राप्त झाली. जसे मूळ हे झाडाच्या मोठेपणाला कारण असते तसे ज्ञान हे तपाचे मूळ आहे. यामुळेच तपात विशुद्धि व अपूर्व सामर्थ्य प्राप्त होते ।। १४८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org