Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६-१४१)
महापुराण
एतेष्वहापयन्किञ्चिद्वतशुद्धि परां श्रितः । सोऽदीपि किरण स्वामिव दीप्रैस्तपोंऽशभिः ॥ १३६ गारवैस्त्रिभिरुन्मुक्तः परां निःशल्यतां गतः । धमर्दशभिरारूढदाढर्योऽभून्मुक्तिवर्मनि ॥ १३७ ।। गुप्तित्रयमयीं गुप्ति धितो ज्ञानासिभासुरः। संवर्तितः समितिभिः स भेजे विजिगीषुताम् ॥ १३८ कषायतस्कर स्यि हृतं रत्नत्रयं धनम् । सततं जागरूकस्य भूयो भूयोऽप्रमाद्यतः ॥ १३९ वाचंयमस्य तस्यासीन्न जातु विकथादरः । नाभिद्यतेन्द्रियरस्य मनोदुर्ग सुसंवृतम् ॥ १४० मनोगारे महत्यस्य बोधिता ज्ञानदीपिका । व्यदीपि तत एवासन्विश्वेऽर्था ध्येयतापदे ॥ १४१ लोच करणे, ( दाढी, मिशा व डोक्याचे केश हाताने उपडणे- केशलोचाची प्रतिज्ञा घेणे, सामायिक, वन्दना, प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यान, चोविस तीर्थंकरांची स्तुति या सहा आवश्यकक्रिया करणे, यामध्ये बाधा न आणणे, स्नान न करणे, जमिनीवर झोपणे, दात न घासणे उभा राहून आहार घेणे व एकदा जेवणे, असे हे अट्ठावीस मूलगुण मुनींना सांगितले आहेत. याहून उत्तरगुण पुनः वेगळे सांगितलेले आहेत. या महामुनींनी या मूलगुण व उत्तरगुणांची आराधना करण्याचा यत्न केला ।। १३३-१३५ ॥
या अठ्ठावीस मूलगुणात व उत्तरगुणात काहीही या मुनिवर्याने त्यागले नाही. त्यामुळे यांच्या व्रताची शुद्धि अत्युत्कृष्ट झाली. त्यामुळे सूर्य जसा आपल्या किरणानी दैदीप्यमान दिसतो तसे हे मुनिवर्य दीर्घ अशा तपरूपी किरणानी चमकत होते ॥ १३६ ॥
मी उत्तमवक्ता आहे, मला उत्कृष्ट आहार मिळतो व मला अनेक ऋद्धि प्राप्त झाल्या आहेत अशा तीन प्रकारच्या गारवानी-गर्वानी हे मुनिवर्य रहित होते. तसेच माया, मिथ्यात्व आणि निदान या तीन शल्यानी रहित होते त्यामुळे शल्यरहित व गारवरहित उत्कृष्ट मुनीपणाला ते प्राप्त झाले होते व मोक्षमार्गात उत्तम क्षमादि दहा धर्मानी उत्कृष्ट दृढतेला पावले होते ॥ १३७ ॥
. मनोगुप्ति, वचनगुप्ति आणि कायगुप्ति या तीन गुप्तीना-जणु गुप्ति नामक शस्त्राला व ज्ञानरूपी तरवारीला धारण केल्यामुळे हे मुनिवर्य मोठे तेजस्वी दिसत होते व ईर्यासमित्यादि पाच समितिरूपी चिलखत धारण केल्यामुळे कर्मशत्रूला जिंकण्याची इच्छा करणारे हे मुनिराज शत्रूना जिंकण्याची इच्छा करणा-या राजाप्रमाणे झाले ॥ १३८॥
हे मुनीश पुनः पुनः जागरूक राहत असत व आपल्या व्रतादिकात सतत प्रमादरहितआळस त्यागून दक्ष राहत होते व त्यामुळे कषायरूपी चोरानी यांचे रत्नत्रयरूपी धन हरण केले नाही ।। १३९ ॥
नेहमी मौनव्रत धारण करणाऱ्या या मुनिवर्याना राजकथा, स्त्रीकथादि विकथामध्ये कधीही आदर वाटला नाही व उत्तमरीतीने रक्षिलेल्या यांच्या मनरूपी किल्याला इन्द्रियानी कधीही फोडले नाही. ॥ १४० ॥
___ या मुनिवर्याच्या विशाल अशा मनरूपी घरात वृद्धिंगत झालेली ज्ञानरूपी दिवटी खूप प्रकाशयुक्त झाली. त्यामुळे सर्व पदार्थ जाणण्यास योग्य असे झाले ॥ १४१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org