Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(३७-१६
निष्कण्टकमिति प्राप्य साम्राज्यं भरताधिपः । बभौ भास्वानिवोद्रिक्तप्रतापः शुद्धमण्डलः ॥ १६ क्षेमकतानतां भेजुः प्रजास्तस्मिन्सुराजनि । योगक्षेमो वितन्वाने मन्वानाः स्वां सनाथताम् ॥ १७ यथास्वं संविभज्यामी सम्भुक्ता निषयोऽमुना । सम्भोगः संविभागश्च फलमर्थार्जने द्वयम् ॥ १८ रत्नान्यपि यथाकामं निविष्टानि निधी शिना । रत्नानि ननु तान्येव यानि यान्त्युपयोगिताम् ॥१९ सूनुश्चक्रभृतामाद्यः षट्खण्डभरताधिपः । राजराजोऽधिराट् सम्राडित्यस्योद्घोषितं यशः ॥ २० नन्दनो वृषभेशस्य भरतः शातमातुरः। इत्यस्य रोदसी व्याप शुभ्रा कोतिरनश्वरी ॥ २१ कीदृक्परिच्छदस्तस्य विभवश्चक्रवर्तिनः । इति प्रश्नवशादस्य विभवोद्देशकीर्तनम् ॥ २२ गलन्मदजलास्तस्य गजाः सुरगजोपमाः । लक्षाश्चतुरशीतिस्ते रदैर्बद्धः सुकल्पितः ॥ २३
निष्कंटक, शत्रुरहित असे साम्राज्य मिळवून ज्याचे मंडळ शुद्ध आहे व ज्याचा प्रताप वाढला आहे अशा सूर्याप्रमाणे भरतेश्वराचा प्रताप वाढला आणि त्याचे सर्वमण्डल-देश हे शुद्ध शत्रुरहित झाले ॥ १६ ।।
योग-अप्राप्त वस्तु प्राप्त करून घेणे आणि क्षेम-प्राप्त झालेल्या वस्तूचे रक्षण करणे, याला योगक्षेम म्हणतात. गुणी उत्तम राजा भरत प्रजांचे योगक्षेम चालवीत होता. त्यामुळे सर्व प्रजा आपणास सनाथ मानीत होती. अर्थात् प्रजेला ज्या इष्टपदार्थांची आवश्यकता वाटत असे ते पदार्थ तिला मिळत असत व प्रजेजवळ असलेल्या पदार्थाचे संरक्षणही भरतराजामुळे चांगले होत असे त्यामुळे प्रजा आपणास सनाथ समजून कुशल मंगलाला प्राप्त झाली होती ॥ १७ ॥
__ महाराजा भरताने योग्यरीतीने विभागणी करून निधींचा उपभोग घेतला. कारण द्रव्य संपादन केल्यावर त्याचा उपभोग घेणे व ते यथायोग्य वाटून देणे ही दोन फळे द्रव्यार्जनाची समजावीत ॥ १८ ॥
या निधिपति भरताने आपल्या इच्छेप्रमाणे रत्ने देखील लोकाना देऊन टाकली. व रत्ने त्यानाच म्हणावे जी लोकाना उपयोगात येतात ॥ १९ ॥
. हा भरत सोळावा मनु आणि सर्व चक्रवर्तिजनात पहिला चक्रवर्ती, षट्खण्डयुक्त 'भरतक्षेत्राचा अधिपति स्वामी, सर्व राजांचा राजा आहे. अधिराट् मुख्य राजा आहे आणि सम्राट् आहे असे याचे यश चोहीकडे वणिले गेले ।। २० ।।
हा भरत वृषभ जिनेश्वराचा पुत्र आहे व याच्या मातेला शंभर पुत्र आहेत. अशा याच्या नाश न पावणाऱ्या शुभ्र कीर्तीने आकाश व भूमी व्यापली होती ॥ २१ ॥
या चक्रवर्ती भरताचा परिवार कसा आहे, केवढा आहे व त्याचे वैभव किती आहे असा श्रेणिकाचा प्रश्न झाला व त्याला गौतमगणधर उत्तर देण्यासाठी याप्रमाणे त्याच्या ऐश्वर्याचे वर्णन करू लागले ॥ २२ ॥
ज्यांच्या गण्डस्थळातून मदजल गळत आहे व जे देवांच्या ऐरावत हत्तीप्रमाणे सुंदर आहेत असे चौयाऐंशी लक्ष हत्ती या भरताचे आहेत, ते सुसज्ज अशा दातानी शोभतात ॥२३।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org