Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
सप्तत्रिंशत्तमं पर्व ।
अथ निर्वतिताशेषदिग्जयो भरतेश्वरः । पुरं साकेतमुत्केतु प्राविक्षत्परया श्रिया ॥ १ तत्रास्य नपशार्दूलैरभिषेकः कृतो मुदा । चातुरन्तजयश्रीस्ते प्रथतां भुवनेष्विति ॥ २ तमभ्यषिञ्चन् पौरास्ते सान्तःपुरपुरोधसः । चिरायः पृथिवीराज्यं क्रियाद्देव भवानिति ॥ ३ राज्याभिषेचने भर्तुर्यो विधिर्वृषभेशिनः। स सर्वोऽत्रापि तीर्थाम्बुसम्भारादिः कृतो नपैः ॥ ४ तथाभिषिक्तस्तेनैव विधिनालडाकृतोऽधिराट् । तथैव जयघोषादिः प्रयुक्तः सामरनपैः ॥५ तथैव सत्कृता विश्वे पार्थिवाः ससनाभयः । तथैव तपितो लोकः परया दानसम्पदा ॥६ तथा ध्वनन्महाघोषा नान्दीघोषा महानकाः । प्रक्षुभ्यदब्धिनिर्घोषो येषां घोषेरधः कृतः ॥७ आनन्दिन्यो महाभेयस्तथैवाभिहता मुहुः । सङगीतविधिरारब्धस्तथा प्रमदमण्डपे ॥८
यानन्तर ज्याने सर्व दिशा जिंकल्या आहेत अशा भरतेश्वराने अनेक पताका जेथे उभारल्या आहेत अशा साकेतनगरात उत्कृष्ट ऐश्वर्यासह प्रवेश केला ॥ १ ॥
त्या नगरात या भरतराजाचा मोठमोठ्या राजानी आनंदाने राज्याभिषेक केला व त्यावेळी सर्व राजानी हे प्रभो, चार दिशा जिंकल्यामुळे आपणास प्राप्त झालेली जयलक्ष्मी सर्व जगामध्ये वृद्धिंगत होवो अशी इच्छा व्यक्त केली ॥ २ ॥
याचप्रमाणे हे प्रभो, आपण दीर्घायुषी होऊन पृथ्वीचे राज्यपालन करा असे म्हणून अन्तःपुर व पुरोहिताना बरोबर घेऊन नागरिकानी त्या भरत चक्रवर्तीचा अभिषेक केला ॥ ३ ॥
जो विधि भगवान् ऋषभनाथाना राज्याभिषेक करताना केला होता ( अर्थात् सर्व तीर्थांचे पाणी एकत्र करणे वगैरे विधि ) तो सर्व विधि या चक्रवर्तीच्या राज्याभिषेकाच्या समयी राजानी केला ॥ ४ ॥
आदिभगवंताना राज्याभिषेक करताना जो विधि केला होता तो सर्व अभिषेकविधि देवासह राजेलोकानी भरताला राज्याभिषेक करताना केला. याचप्रमाणे अभिषेक करून जयघोषादिकही केले ॥ ५ ॥
त्यावेळी भरतचक्रीने सर्व राजांचा व त्यांच्या परिवारांचा आदरसत्कार केला व उत्कृष्ट अशा दानसंपदेने सर्व लोकाना चक्रवर्तीने सन्तुष्ट केले ॥ ६ ॥
ज्यांचा ध्वनि मोठा आहे व ज्यांचा ध्वनि मंगलकारक आहे असे मोठे नगारे वाजू लागले आणि आपल्या आवाजानी खवळलेल्या समुद्राच्या गर्जनेला त्यानी हीन केले, जिंकिले ।।७।।
आनंदाच्या प्रसंगी वाजविण्याचे नगारे पूर्वीप्रमाणे वारंवार वाजविले आणि उत्सवाच्या मण्डपात गायनाचा थाट पूर्वीसारखाच आरंभिला ।। ८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org