Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३१-१५४)
महापुराण
(२०१
सप्रसादं च सम्मान्य सत्कृतास्ते महीभुजः । प्रभोरनुमताद्भूयः स्वमोकः प्रत्ययासिषुः ॥१५४ इत्थं पुण्योदयाच्चक्री बलात्प्रत्यन्तपालकान् । विजिग्ये दण्डमात्रेण जयः पुण्यादृते कुतः ॥ १५५
मालिनीवृत्तअथ नृपतिसमाजेनाचितः सानुरागम् । विजिनसकलदुर्गः प्रह्वयम्लेच्छनाधान् ॥ पुनरपि विजयायायोजि सोऽग्रेसरत्वे । जय इव जयचिह्नर्मानितो रत्नभा ॥ १५६ जयति जिनवराणां शासनं यत्प्रसादात् पदमिदमधिराज्ञां प्राप्यते हेलयैव ॥ समुचितनिधिरत्नप्राज्यभोगोपभोग-प्रकटितसुखसारं भूरिसम्पत्प्रसारम् ॥ १५७
छत्रं चन्द्रकरापहासि रुचिरं चामीकरप्रोज्ज्वलद्दण्डं चामरयुग्मकं सुरसरिड्डिण्डीरपिण्डच्छवि ॥ रुक्माद्रेरिव संविभक्तमपरं कूट मृगेन्द्रासनम् । लेभेऽसौ विजयार्द्धनाथविजयाद्रत्नान्यथान्यान्यपि ॥ १५८
भरतराजाने प्रसन्नतेने म्लेच्छराजांचा बहुमानाने सत्कार केला. यानंतर ते म्लेच्छराजे त्यांची आज्ञा घेऊन आपआपल्या स्थानी गेले ॥ १५४ ।।
याप्रमाणे पुण्योदयाने चक्रवर्तीने फक्त एका दण्डरत्नाच्या साहाय्याने बलात्काराने म्लेच्छदेशांच्या राजाना वश केले. बरोबरच आहे की, पुण्याशिवाय जय कोठून प्राप्त होईल बरे ? ॥ १५५ ॥
यानंतर राजांच्या समूहानी ज्याचा प्रेमाने आदर केला आहे व ज्याने म्लेच्छराजाना वश करून त्यांचे सर्व किल्ले जिंकले आहेत अशा त्या जयकुमार सेनापतीचा चौदा रत्नांचा अधिपति अशा भरतराजाने विजयाच्या चिह्नानी आदर केला व पुनः त्याने विजयासाठी सेनापतिदावर त्याला नियुक्त केले ॥ १५६ ।।
नऊ निधि व चौदा रत्ने व उत्कृष्ट भोगोपभोगानी ज्याने सर्वसुखांचा सार प्रकट केला आहे व ज्याने सर्व संपदांचा समूह मिळवून दिला आहे व हे चक्रवर्तीचे पद ज्याच्या आश्रयाने लीलेनेच प्राप्त होते असे हे जिनेन्द्राचे शासन नेहमी जयवंत असो ॥ १५७ ॥
चक्रवर्ती भरताने विजयार्धपर्वताच्या स्वामीला-कृतमालनामक देवाला जिंकल्यामुळे त्याच्यापासून चन्द्राच्या किरणाना हसणारे कान्तियुक्त छत्र, सुवर्णाचे उज्ज्वल दाण्डे ज्याना आहेत व गंगानदीच्या फेसाच्या पिण्डाप्रमाणे कान्ति ज्यांची आहे अशा दोन चवऱ्या, मेरुपर्वतापासून जणु वेगळे केलेले हे त्याचे शिखर आहे असे सिंहासन हे पदार्थ मिळविले व आणखीही अनेक रत्ने मिळविली ।। १५८ ॥ म. २६
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org