Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३४-१५५
मेघान्धकारिताशेषदिक्चक्रे जलदागमे । योगिनो गमयन्ति स्म तरुमूलेषु शर्वरीः ॥ १५५ मुसलस्थूलधाराभिर्वर्षत्सु जलवाहिषु । निशामनैषुरव्यथ्या वार्षिकीं ते महर्षयः ॥ १५६ ध्यान गर्भगृहान्तस्था धृतिप्रावारसंवृताः । सहन्ते स्म महासत्त्वास्ते घनाघनदुर्दिनम् ॥ १५७ हिमानीपरिक्लिष्टां तनुर्याष्ट हिमागमे । दधुरभ्रावकाशेषु शयाना मौनमास्थिताः ।। १५८ अनग्नमुषिता एव नग्नास्तेऽनग्निसेविनः । घृतिसंर्वामतैरङ्गः सेहिरे हिममारुतान् ॥ १५९ हिमानीषु त्रियामासु स्थगितास्ते हिमोच्चयैः । प्रवारितैरिवाङ्गः स्वैर्धीराः स्वयमशेरत ॥ १६० त्रिकालविषयं योगमास्थायैवं दुरुद्वहम् । सुचिरं धारयन्ति स्म धीरास्ते धृतियोगतः ॥ १६१ दधानास्ते तपस्तापमन्तर्दीप्तं दुरासदम् । रेजस्तरङगितैरङ्गः प्रायोऽनुकृतवार्द्धयः ।। १६२
२७२)
महापुराण
जेव्हा पावसाळयाचे आगमन होई तेव्हा सर्व दिशामंडल मेघानी अन्धकारयुक्त होत असे. त्यावेळी हे मुनिराज झाडाच्या तळी बसून आत्मध्यानात रात्री घालवीत असत ।। १५५ ॥
जेव्हा मेघ मुसळाप्रमाणे स्थूल जलधारानी वृष्टि करीत असत त्यावेळी ते महर्षि पीडारहित होऊन पावसाळ्याच्या रात्री घालवीत असत ।। १५६ ॥
ध्यानरूपी गर्भगृहात माजघरात ते महाशक्तिशाली मुनि धैर्यरूपी पांघरुणाने वेष्टिलेले होऊन पावसाळयाच्या ढगानी व्यापिलेले दिवस सहन करीत असत ।। १५७ ।।
उघड्या मैदानात झोपणारे व मौन धारण केलेले असे ते मुनि हिवाळयात बर्फाच्या कणानी पीडित अशा शरीररूपी काठीला धारण करीत असत. ते नग्न मुनि अग्नीचे सेवन करीत नसत. धैर्यरूपी आवरणानी आच्छादित झालेल्या आपल्या शरीराच्या अवयवानी जणु नग्न नसलेले असे होत्साते बर्फसहित कणानी वाहणाऱ्या अशा वाऱ्यानी होणारे कष्ट सहन करीत असत ।। १५८-१५९ ।।
हिवाळ्याच्या अनेक रात्रीमध्ये ते मुनि बर्फाच्या समूहाने आच्छादित होत असत. त्यावेळी जणु ते वस्त्रानी झाकलेल्या आपल्या अवयवानी युक्त आहेत असे वाटत असे ते मुनि धैर्य धारण करून झोपत असत ।। १६० ॥
याप्रमाणे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन कालचे जे आतापन, तरूमूलवास आणि अवकाश योग हे धारण करण्यास फार कठिण आहेत पण या मुनीनी ते दीर्घकालपर्यन्त धारण केले. कारण हे मुनि अतिशय धैर्यवान होते आणि ते योग त्यानी धैर्यामुळे धारण केले ।। १६१ ।।
आत प्रज्वलित झालेले व इतराना प्राप्त होण्यास कठिण असलेले असे तपाचे तेज धारण करणारे ते मुनि तरङगाप्रमाणे झळकणारे आपल्या अंगानी अवयवानी तरंग युक्त समुद्राचे अनुकरण जणु करीत आहेत असे शोभले ।। १६२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org