Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
पञ्चत्रिंशत्तमं पर्व
अथ चक्रधरस्यासीत्किञ्चिच्चिन्ताकुलं मनः । दोर्बलिन्यनुनेतव्ये यूनि दोर्दर्पशालिनि ॥ १ अहो भ्रातृगणोऽस्माकं नाभिनन्दति नन्दथुम् । सनाभित्वादवध्यत्वं मन्यमानोऽयमात्मनः ॥ २ अवध्यं शतमित्यास्था नूनं भ्रातृशतस्य मे । यतः प्रणामविमुखं गतवन्नः प्रतीपताम् ॥ ३ न तथास्मादृशां खेदो भवत्यप्रणते द्विषि । दुर्गविते यथाज्ञातिवर्गेऽन्तर्गेहवर्तिनि ॥ ४ मुखैरनिष्टवाग्वह्रिदीपितैरतिधूमिताः । दहन्त्यलातवच्च स्वाः प्रातिकूल्यानिलेरिताः ॥ ५ प्रतीपवृत्तयः कामं सन्तु वान्ये कुमारकाः । बाल्यात्प्रभृति येऽस्माभिः स्वातन्त्र्येणोपलालिताः ॥ ६ युवा तु दोर्बली प्राज्ञः क्रमज्ञः प्रश्रयी पटुः । कथं नाम गतोऽस्मासु विक्रियां सुजनोऽपि सन् ॥ ७ कथं च सोऽनुनेतव्यो बली मानधनोऽधुना । जयाङ्गं यस्य दोर्दर्पः श्लाध्यते रणमूर्धनि ॥ ८
यानंतर आपल्या बाहूंच्या गर्वाने शोभणाऱ्या तरुण बाहुबलीला वश करण्याच्या कार्यात चक्रवर्तीचे मन चिन्तेने थोडेसे व्याकुळ झाले . ॥ १ ॥
अरेरे हा आम्हा भावांचा समूह आम्ही एकाच कुलात जन्मलो आहोत, भाऊबंद आहोत, आम्ही अवध्य आहोत असे समजत आहे व त्यामुळे आमचे अभिनंदन करण्याच्या कामी आनन्द मानीत नाही. आमच्या या ऐश्वर्याविषयी त्यांचे मन ईर्ष्या द्वेष बाळगीत आहे ॥ २ ॥
माझे हे शंभर भाऊ आम्ही शंभरजण अवध्य आहोत असा विश्वास मनात बाळगीत आहेत म्हणून मला नमस्कार करण्याच्या कामी ते विमुख होऊन माझ्याशी विरोध करीत आहेत ॥ ३ ॥
शत्रु नम्र नाही झाला तरी मला तसा खेद वाटत नाही पण आपल्या घरात एकत्र राहणारे आपले भाऊबंद गविष्ठ होऊन ते नम्र न झाल्यामुळे मन खेद - खिन्न होत आहे ॥ ४ ॥ अनिष्ट बोलणे हाच अग्नि त्याने त्यांचे तोंड प्रज्वलित झाले आहे व त्यामुळे अशुभ चिन्तनरूपी धुराने हे भाऊबंद धुरकटले आहेत व माझ्याशी प्रतिकूल वागणेरूप वाऱ्याने हे भडकले आहेत. त्यामुळे अग्नीच्या कोलतीप्रमाणे मला जाळण्यासाठी- दुःख देण्यासाठी उद्यत झाले आहेत ॥ ५ ॥
हे सगळे माझे इतर भाऊ यथेच्छ माझ्या उलट वागोत कारण बालपणापासून त्यांना स्वतन्त्रपणे वागू दिले आहे ॥ ६ ॥
पण बाहुबली तरुण, बुद्धिमान् व वंशपरंपरा जाणणारा आहे, धाकट्यानी मोठ्याशी कसे वागावे याचे ज्ञान त्याला आहे, तो विनयाने वागणारा आणि हुशार आहे. अल्लड नाही, सज्जन आहे. असा असूनही माझ्याविषयी तो असा विरुद्ध का वागत आहे ? ॥ ७ ॥
तो भुजबली अभिमानरूपी धन जवळ बाळगणारा व बलवान् आहे. त्याला आता क बरे वश करावे ? व त्याचे विजयाचे साधन अशा दोन बाहूंचा गर्व भयंकर युद्धात लोकाकडून प्रशंसिला जात असतो ॥ ८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org