Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६-११२)
महापुराण
(३२९
दीक्षावल्या परिष्वक्तस्त्यक्ताशेषपरिच्छवः । स रेजे-सलतः पत्रमोक्षक्षाम इव द्रुमः ॥ १०५ गुरोरनुमतेऽधीती दधवेकविहारिताम् । प्रतिमायोगमावर्षमातस्थे किल संवृतः ॥ १०६ सशंसितवतोऽनाश्वान् बनवल्लीततान्तिकः । वल्मोकरन्ध्रनिःसर्पत्सरासीभयानकः ॥ १०७ श्वसदाविर्भवद्भोगभुजङ्गशिशुजम्भितः । विषाङकुरैरिवोपाङघ्रि स रेजे वेष्टितोऽभितः ॥ १०८ वधानः स्कन्धपर्यन्तलम्बिनीः केशवल्लरीः । सोऽन्वगाढकृष्णाहिमण्डलं हरिचन्दनम् ॥ १०९ माधवीलतया गाढमुपगूढः प्रफुल्लया। शाखाबाहुभिरावेष्टय सध्रीच्येव सहायया ॥ ११० विद्यापरीकरालूनपल्लवा सा किलाशुषत् । पादयोः कामिनीवास्य सामि नम्रानुनेष्यती ॥ १११ रेजे स तववस्थोऽपि तपो दुश्चरमाचरन् । कामीव मुक्तिकामिन्या स्पृहयालः कृशीभवन् ॥ ११२
ज्याने राज्यादिपरिवार व सर्व परिग्रह त्यागले आहेत असा तो बाहुबली दीक्षा वेलीने जेव्हा अलिंगित झाला. त्यावेळी ज्याची पाने सगळी गळून पडली आहेत व त्यामुळे कृश झालेल्या व लतेने सहित असलेल्या वृक्षाप्रमाणे तो शोभू लागला ॥ १०५ ॥
गुरूच्या आज्ञेत राहून शास्त्रांचे अध्ययन करणाऱ्या बाहुबलीने एकटा विहार करण्याचे व्रत धारण केले आणि जितेन्द्रिय होऊन एक वर्षपर्यन्त एकाच जागी उभे राहून प्रतिमायोग धारण केला ॥ १०६ ॥
बाहुबलि मुनिराजानी प्रशंसित अशी व्रते धारण केली. त्यांच्या व्रतांची लोक प्रशंसा करीत असत. एक वर्षाचा प्रतिमायोग धारण केल्यामुळे एक वर्षपर्यंत त्यांनी आहार धारण केला नाही. त्यांच्या आजूबाजूचा प्रदेश वनवल्लीनी व्याप्त झाला होता. आजुबाजूला वारुळाच्या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या सर्पानी ते मुनिराज भयानक दिसू लागले ॥ १०७ ॥
___ श्वास सोडीत म्हणजे फूत्कार करीत ज्यांची शरीरे बाहेर आली आहेत अशा बाल सर्पानी श्रीबाहुबलिमुनीश्वरांच्या पाया सभोवती वेढा घातला होता तेव्हा ते मुनिराज विषांच्या अंकुरांनी वेढल्याप्रमाणे शोभले ।। १०८ ॥
खांद्यापर्यन्त लोंबणाऱ्या केशरूपी वेलीना धारण करणारे बाहुबलि मुनिराजानी ज्याने काळ्या सर्वांचा समूह धारण केला आहे अशा चन्दनवृक्षाचे अनुकरण केले आहे असे वाटले ॥ १०९॥
प्रफुल्ल अशा मोगऱ्याच्या वेलीने आपल्या शाखारूपी बाहूनी वेढून घट्ट आलिंगिलेले ते मुनिराज पुष्पहार धारण केलेल्या एखाद्या मैत्रिणीने जणु आलिंगित झाले आहेत असे दिसले॥११०
जिची कोवळी पाने विद्याधर स्त्रियानी तोडली आहेत अशी ती मोगऱ्याची वेल या मुनिराजाच्या दोन पायावर पडली होती. तेव्हा ती थोडेसे नम्र होऊन मुनींची जणु विनवणी करीत असलेल्या स्त्रीप्रमाणे शुष्क झाली ।। १११ ।।
ते बाहुबलि मुनिराज तशा अवस्थेतही म्हणजे कठिण तप करीत असतांही, मुक्तिरूपी स्त्रीमध्ये अभिलाषा ठेवून कृश झाले व त्यामुळे कामिपुरुषाप्रमाणे शोभले ।। ११२ ॥ म. ४२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org