Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३६-११३
तपस्तनूनपात्तापसन्तप्तस्यास्य केवलम् । शरीरभशुषनोवंशोषं कर्माप्यशर्मदम् ॥ ११३ तीव्रं तपस्यतोऽप्यस्य नासीत्कश्चिदुपप्लवः । अचिन्त्यं महतां धेयं येनायान्ति न विक्रियाम् ॥ ११४ सर्वसहः क्षमाभारं प्रशान्तः शीतलं जलम् । निःसङ्गः पवनं दीप्तः स जिगाय हुताशनम् ॥ ११५ क्षुधं पिपासां शीतोष्णं स दंशमशकद्वयम् । मार्गाच्यवनसंसिद्धयं द्वन्द्वानि सहते स्म सः ॥ ११६ सनाग्न्यं परमं बिभ्रनाभेदीन्द्रियधूर्तकः । ब्रह्मचर्यस्य सा गुप्तिर्नान्यं नाम परं तपः ॥ ११७ ति चारतिमप्येष द्वितयं स्म तितिक्षते । न रत्यरतिबाधा हि विषयानभिषङ्गिणः ॥ ११८ नात्यासीत् स्त्रीकृता बाषा भोग निर्वेदमापुषः । शरीरमशुचि स्त्रैणं पश्यतश्चर्मपुत्रिकाम् ॥ ११९
३३०)
महापुराण
तपरूपी अग्नीच्या तापाने संतप्त झालेल्या या मुनिराजाचे शरीरच केवळ वरून - खालीपर्यन्त शुष्क झाले असे नाही तर दुःख देणारे कर्म देखिल वरून खालीपर्यंत शुष्क झाले, सुकून गेले ।। ११३ ॥
हे मुनिराज तीव्र तप करीत असताही याना कोणताहि विकार - उपद्रव उत्पन्न झाला नाही. बरोबरच आहे की, महापुरुषांचे धैर्य अचिन्त्य - अतर्क्यं असते त्यामुळे ते विकारयुक्त होत नाहीत ।। ११४ ।।
सर्वं उपसर्ग आणि भूक तहान वगैरे परीषहांना सहन करणाऱ्या या मुनिराजानी पृथ्वीला जिंकिले. अतिशय शान्तियुक्त असल्यामुळे त्यांनी शीतल पाण्याला जिंकले. परिग्रहरहित असल्यामुळे त्यांनी वायूला जिंकले आणि तपाने दीप्त झाल्यामुळे त्यानी अग्नीला जिंकले होते ॥ ११५ ॥
ते मुनिराज रत्नत्रयरूप मोक्षमार्गापासून च्युत न व्हावे व त्या मोक्षमार्गाची सिद्धि व्हावी म्हणून भूक, तहान, थंडी, उष्णता, दंशमशक- डास, ढेकूण, विंचू वगैरे चावणारे जे जीव त्यापासून होणारा त्रास सहन करीत असत ॥। ११६ ।।
उत्कृष्ट नग्नपणा धारण करणान्या त्या मुनिराजांना इन्द्रियरूपी धूर्त संयम भ्रष्ट करू शकले नाहीत. वैराग्यपूर्ण नग्नता ही उत्कृष्ट तप आहे. व हेच ब्रह्मचर्याचे उत्कृष्ट रक्षण करणारे आहे ।। ११७ ॥
मुनिवर्य, पंचेन्द्रिय विषयापासून पूर्ण विरक्त होते म्हणून त्याना रति व अरतीची बाधा होत नव्हती. ते रति व अरति या दोन्ही उपसर्गाना सहन करीत होते ।। ११८ ॥
भोगापासून विरक्ति यांच्या ठिकाणी पूर्ण पुष्ट झाली होती म्हणून स्त्रीपरीषहाची बाघा याना झाली नाही. कारण स्त्रीशरीर हे अपवित्र आहे. स्त्री ही चामड्याची पुतळी आहे असे ते पाहत असत ॥ ११९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org