Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२८)
महापुराण
(३६-९८
दूषितां कण्टकैरेनां फलिनीमपि ते श्रियम् । करेणापि स्पृशेद्धीमाल्लतां कण्टकिनी च कः ॥ ९८ विषकण्टकजालीव त्याज्यषा सर्वथापि नः । निष्कण्टकां तपोलक्ष्मी स्वाधीनां कर्तुमिच्छताम् ॥९९ मृष्यतां च तदस्माभिः कृतमागो यदीदृशम् । प्रच्युतो विनयात्सोऽहं स्वं चापलमदीदशम् ॥१०० इत्युच्चरगिरामोघो मुखाबाहुबलीशितुः । ध्वनिरब्दादिवातप्तं जिष्णोरालादयन्मनः ॥१०१ हा दुष्टं कृतमित्युच्चरात्मानं स विगर्हयन् । अन्ववातप्त पापेन कर्मणा स्वेन चक्रराट् ॥ १०२ प्रत्युक्तानुनयं भूयो मनुमन्त्यं स धीरयन् । न्यवृतन्न स्वसङ्कल्पादहो स्थैयं मनस्विनाम् ॥ १०३ महाबलिनि निक्षिप्तराद्धिः स स्वनन्दने । दीक्षामुपादधे जैनी गुरोराराधयन्पदम् ॥ १०४
___ अनेक माण्डलिक राजेरूपी काट्यानी भरलेली अशी ही तुझी राज्यलक्ष्मी जरी फले देणारी असली तरी ती तुलाच लखलाभ होवो. करण कोणता विचारी शाहणा मनुष्य या काटेरी लतेप्रमाणे असलेल्या तिला हाताने देखिल स्पर्श करील बरे? ॥ ९८ ॥
जी निष्कण्टक आहे, जिला कोणीही शत्रु नाही अशा तपोलक्ष्मीला हस्तगत करून घेण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ही राज्यलक्ष्मी विषारी काट्यांच्या जाळीप्रमाणे पूर्णपणे त्याज्य आहे ॥ ९९ ॥
म्हणून आमच्याकडून जो हा असला अपराध केला गेला आहे तो आपण सोसून घ्या. मी विनयापासून भ्रष्ट झालो होतो. म्हणून असला माझा चपलपणा-मूर्खपणा आपणास दाखविला आहे ।। १०० ॥
याप्रमाणे बाहुबलीराजाच्या मुखापासून उच्चारला गेलेल्या वाणीच्या प्रवाहाने मेघापासून उत्पन्न झालेल्या ध्वनीप्रमाणे जयशाली भरताच्या संतप्त झालेल्या मनाला आनंदित केले ।। १०१ ॥
अरेरे मी फार वाईट कार्य केले असे म्हणून भरताने आपली निंदा करीत स्वतःच्या पापकर्मामुळे फार पश्चात्ताप केला ॥ १०२ ॥
__ व पुनः अन्तिम मनु भरताने त्या बाहुबलीचा पुष्कळ अनुनय विनय केला अर्थात् तू दीक्षा घेऊ नकोस म्हणून प्रार्थना केली. तथापि त्याने त्याला धीर दिला व स्वतःच्या संकल्पापासून तो चलित झाला नाही. बरोबरच आहे की स्वाभिमानी लोकांचे आपले कार्य करण्याची स्थिरता-निश्चय आश्चर्ययुक्त व दृढ असते ॥ १०३ ॥
बाहुबलीने आपल्या महाबलिनामक पुत्रावर सर्व राज्याचे वैभव ठेवले. त्याला राज्य दिले व गुरु आदिभगवंताच्या चरणाची आराधना करून त्याने जिनदीक्षेचा स्वीकार केला ॥ १०४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org