________________
३६-९७)
महापुराण
इत्यशाश्वतमप्येतद्राज्यादि भरतेश्वरः । शाश्वतं मन्यते कष्टं मोहोपहतचेतनः ॥ ९० चिरमाकलयशेवमग्रजस्यानुदात्तताम् । व्याजहारैनमुद्दिश्य गिरः प्रपरुषाक्षराः ॥ ९१
भो नृपशार्दूल क्षणं वैलक्ष्यमुत्सृज । मूढेनेदं त्वयालम्बि दुरीहमतिसाहसम् ॥ ९२ अभेद्ये मम देहाद्रौ त्वया चक्रं नियोजितम् । विद्वचकिञ्चित्करं वाज्ञे शैले वज्रमिवापतत् ॥ ९३ अन्यत्र भ्रातृभाण्डानि भङक्त्वा राज्यं यदीप्सितम् । त्वया धर्मो यशश्चैव तेन पेशलमर्जितम् ॥९४ चक्रभृद्भरतः स्रष्टुः सुनुराद्यस्य योऽग्रणीः । कुलस्योद्वारकः सोऽभूदितीडाऽस्थापि च त्वया ॥ ९५ जितं च भवतैवाद्य यत्पापोपहतामिमाम् । मन्यसेऽनन्यभोगीनां नृपश्रियमनश्वरीम् ॥ ९६ प्रेयसीयं तवैवास्तु राज्यश्रीर्या त्वयादृता । नोचितेषा ममायुष्मन् बन्धो न हि सतां मुदे ।। ९७
(३२७
याप्रमाणे हे राज्यादिक अनित्य आहेत पण हा भरत राजा मोहाने ज्याची चैतन्यशक्ति ग्रस्त झाली आहे असा झाला आहे. तो हे राज्यादिक नित्य आहेत असे मानत आहे. ही फार खेदाची गोष्ट आहे ॥ ९० ॥
आपल्या ज्येष्ठ भावाचा हलका स्वभाव आहे याचा फार वेळ विचार करून त्याला उद्देशून ज्यात कठोर अक्षरे आहेत अशी भाषणे बाहुबलीने बोलावयास सुरूवात केली ॥ ९१ ॥ हे नृपश्रेष्ठा क्षणपर्यन्त मनातील लज्जा खिन्नता सोडून दे व माझे म्हणणे ऐक. मूर्ख अशा तुजकडून हे इतर कोणी करण्यास इच्छिणार नाही असे अयोग्य मोठे साहस अवलंबिले गेले आहे. अर्थात् फार मोठा अविचार तूं केला आहेस ।। ९२ ।
माझ्या अभेद्य अशा देहरूपी पर्वतावर तूं चक्र सोडलेस परन्तु वज्रनिर्मित पर्वतावर ते पडलेल्या वज्राप्रमाणे माझ्या वज्रमय देहावर पडून काहीच कार्य करू शकले नाही. ते तू पक्के जाण ।। ९३ ॥
दुसरे असे पहा - आपल्या सर्व भावांची सर्व संपत्ति नष्ट करून राज्य मिळविण्याची जी इच्छा केलीस त्यामुळे तू उत्तम धर्म आणि यश मिळविलेस असे म्हटले पाहिजे अर्थात्विपरीतलक्षणेने हा टोमणा बाहुबलीने भरताला मारला आहे. अर्थात् तू मोठा अधर्म व अपकीर्ति मिळविली आहेस ।। ९४ ।।
आदिब्रह्मा वृषभनाथाचा पुत्र चक्रवर्ती भरत हा सर्व शंभर पुत्रात श्रेष्ठ आहे व · कुलाचा तो उद्धारक आहे अशी स्तुति देखिल तू सर्वत्र स्थापिली आहेस. अर्थात् तू कुलाचा विध्वंस केला आहेस व सर्वत्र अकीर्ति तुझी पसरली आहे ॥ ९५ ॥
Jain Education International
व तूच आज खरोखर विजय मिळविला आहेस कारण ही पापानी भरलेली राज्यलक्ष्मी नाश न पावणारी व दुसऱ्याकडून कधीही न उपभोगली गेलेली आहे असे मानीत आहेस ।। ९६॥ हे आयुष्मन्ता, जी राज्यलक्ष्मी तू स्वीकारली आहेस ती तुलाच अतिशय लाडकी असो. हे बंधो, ही राज्यलक्ष्मी मलाही योग्य नाही. कारण हिच्या मोहामुळे होणारा कर्मबन्ध सज्जनाना आनन्ददायक होत नसतो ।। ९७ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org