Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६-८१)
महापुराण
(३२५
वरं विषं यदेकस्मिन्भवे हन्ति न हन्ति वा । विषयास्तु पुनर्नन्ति हन्त जन्तूनन्तशः ॥ ७४ आपातमात्ररम्याणां विपाककटुकात्मनाम् । विषयाणां कृतेनाज्ञो यात्यनानपार्थकम् ॥ ७५ अत्यन्तरसिकानादौ पर्यन्ते प्राणहारिणः । किम्पाकपाकविषमान्विषयान्कः कृती भजेत् ॥ ७६ शस्त्रप्रहारदीप्राग्निवज्राशनिमहोरगाः । न तथोद्वेजकाः पुंसां यथामी विषयद्विषः ॥ ७७ महाब्धिरौद्रसद्धग्रामभीमारण्यसरिगिरीन् । भोगाथिनो भजन्त्यज्ञा धनलाभधनायया ॥७८ दीर्घदोर्घातनिर्घातनिर्घोषविषमीकृते । यादसां यादसां पत्यो चरन्ति विषयार्थिनः ॥ ७९ समापतच्छरवातनिरुद्धगगनाङ्गणम् । रणाङ्गणं विशन्त्यस्तभियो भोगविलोभिताः ॥ ८० चरन्ति वनमानुष्या यत्र सत्रासलोचनाः । ताः पर्यटन्त्यरण्यानी गाशोपहता जडाः ॥ ८१
विष हे एका भवात प्राण्याला मारते किंवा मारीतही नाही. पण हे विषय मात्र प्राण्याना अनन्त वेळा मारीत आले आहेत. म्हणून यांच्यापेक्षा विष बरे आहे ॥ ७४ ।।
हे विषय वरून फक्त फार सुंदर दिसतात, पण फलकाली हे फार कडु आहेत असा अनुभव येतो. पण या विषयामुळे अज्ञ मनुष्य व्यर्थ अनेक अनर्थाना-दुःखाना-संकटाना प्राप्त होतो ॥ ७५ ॥
हे पंचेन्द्रियाचे विषय आरंभी अत्यन्त आनन्द देतात पण शेवटी प्राणहरण करतात. म्हणून किंपाक नावाच्या फळाप्रमाणे यांचे सेवन अत्यन्त दुःखदायक आहे. कोणता शहाणा मनुष्य या विषयांचे सेवन करील बरे? ॥ ७६ ॥
हे विषयशत्रु जसे मनुष्यांना दुःख देतात तसे दुःख शस्त्रांचे प्रहार, खूप पेटलेला अग्नि, वज्र व वीज अंगावर पडणे व मोठे सर्प देखील जीवाला देत नाहीत ॥ ७७ ॥
मोठा समुद्र, भयंकर युद्ध, भयंकर जंगल, नद्या आणि पर्वत यांचे देखील अज्ञ लोक धनाची प्राप्ति होईल म्हणून सेवन करतात. धनाच्या आशेने वरील भयंकर समुद्रादिकात प्रवेश करतात व दुःख भोगतात ॥ ७८ ॥
विषयलंपट झालेले लोक जलचर, मगर वगैरे प्राण्यांच्या दीर्घ हातानी ताडन केल्यामुळे विद्युत्पाताप्रमाणे प्रचण्ड शब्दानी क्षुब्ध झालेल्या समुद्रात देखील प्रवेश करतात ।। ७९ ॥
विषयाभोगानी लुब्ध केलेले लोक त्यासाठी जेथे सारखी बाणांची वृष्टि होत आहे व त्यामुळे जेथील आकाश व्यापलेले आहे अशा युद्धस्थानी निर्भय होऊन प्रवेश करतात ॥ ८० ॥
ज्यांचे डोळे भीतीने चंचल झाले आहेत असे रानटी लोक जेथे प्रवेश करतात अशा महाभंयकर मोठ्या अरण्यात विषयभोगाच्या आशेने पीडित झालेले अज्ञ लोक प्रवेश करतात ॥ ८१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org