Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३६-६६
आध्यानमात्रमेत्याराददः कृत्वा प्रदक्षिणाम् । अवध्यस्यास्य पर्यन्तं तस्थौ मन्दीकृतातपम् ॥ ६६ कृतं कृतं बतानेन साहसेनेति धिक्कृतः । तदा महत्तमैश्चक्री जगामानुशयं परम् ॥ ६७ कृतापदान इत्युच्चैः करेण तुलयन्नृपम् । सोऽवतीर्यांसतो धीरो निकृष्टां भूमिमापयत् ॥ ६८ सत्कृतः स जयाशंसमभ्येत्य नृपसत्तमैः । मेने सोत्कर्षमात्मानं तदा भुजबली प्रभुः ॥ ६९ अचिन्तयच्च fक नाम कृते राज्यस्य भङगिनः । लज्जाकरो विधिर्भ्रात्रा ज्येष्ठेनायमधिष्ठितः ॥७० विपाककटु साम्राज्यं क्षणध्वंसि धिगस्त्विदम् । दुस्त्यजं त्यजदप्येतदगिभिर्बुष्कलत्रवत् ॥ ७१ अहो विषयसौख्यानां वैरूप्यमपकारिता । भङगुरत्वमरुच्यत्वं सक्तैर्नान्विष्यते जनः ॥ ७२ को नाम मतिमानी सेद्विषयान्विषदारुणान् । येषां वशगतो जन्तुर्यात्यनर्थपरम्पराम् ॥ ७३
३२४)
महापुराण
मनात चिन्तन केल्याबरोबर ते चक्ररत्न आले व त्यानें अवध्य असलेल्या या बाहुबलीला एक प्रदक्षिणा घातली आणि ज्याने सूर्याचा प्रकाश मंद केला आहे असे ते त्याच्याजवळ उभे राहिले ॥ ६६ ॥
त्यावेळी मोठ्या अनेक राजानी ' अरेरे हे असले हीनमनोवृत्तीचे द्योतक साहस पुरे 'करा' असे म्हणून चक्रवर्तीचा धिक्कार केला तेव्हा चक्रवर्तीला अतिशय पश्चात्ताप झाला ॥६७॥ ज्याने मोठा पराक्रम केला आहे व ज्याने आपल्या हाताने वर तोलून धरले होते अशा त्या बुद्धिमान् बाहुबलीने आपल्या खांद्यावरून उतरवून खालच्या निकृष्ट जमीनीवर त्याला ठेवले अथवा (धीरोऽनिकृष्टां ) त्या बुद्धिवंताने निकृष्ट नसलेल्या म्हणजे उत्तम अशा जमिनीवर भरताला ठेवले ॥ ६८ ॥
त्यावेळी उत्तम राजे बाहुबलीजवळ आले. त्यानी त्याच्या जयाची प्रशंसा करून त्याचा सत्कार केला. तेव्हा बाहुबलीने आपल्याला उत्कर्षशाली मानले ॥ ६९ ॥
त्यावेळी असा विचार केला कशासाठी बरे माझ्या वडील भावाने हे लज्जा उत्पन्न करणारे कार्य केले ! कारण हे राज्य नश्वर आहे ।। ७० ।।
हे साम्राज्य परिणामी कटु-कडु आहे- दुःख देणारे आहे, क्षणात नाश पावणारे आहे. याला धिक्कार असो. हे साम्राज्य व्यभिचारिणी स्त्री जसा पतीचा त्याग करते त्याप्रमाणे आपणास उपभोगणाऱ्या राजाचा त्याग करणारे आहे पण राजाला मात्र ते सोडावेसे वाटत नाही ॥ ७१ ॥
या विषयसुखांत आसक्त झालेले लोक या विषयसुखांचा निद्यपणा, त्या पासून होणारा अपकार-दुःख, त्याचा नाशवंतपणा व शेवटी त्यापासून प्राप्त होणारी अरुचि विरसपणा यांचा शोध करीत नाहीत. हा मोठा अविवेक आहे ।। ७२ ।।
कोणता शाहणा मनुष्य विषाप्रमाणे भयंकर असलेल्या या पंचेन्द्रियाच्या विषयांची इच्छा करील बरे? या विषयात आसक्त झालेला प्राणी नाना अनर्यांनी संकटानी युक्त होतो. नाना संकटानी ग्रस्त होतो ॥ ७३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org