Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०४)
(३५-१७४
तमो विधूय दूरेण, जगदानन्दिभिः वरः । उदियाय शशी लोकं क्षीरेण क्षालयन्निव ।। १७४ अखण्ड मनुरागेण निजं मण्डलमुद्वहन् । सुराजेव कृतानन्दमुदगाद्विधुरुत्करः ।। १७५ वृष्ट्वैवाकृष्टहरिणं हरि हरिणलाञ्छनम् । तिमिरौषः प्रदुद्राव करियथसवृद्धमहान् ॥ १७६ तततारावली रेजे ज्योत्स्नापूरः सुधाच्छवेः । सबुद्बुद इवाकाशसिन्धोरोधः परिक्षरन् ॥ १७७ हंसपोत इवान्विष्यन् शशी तिमिरशैवलम् । तारासहचरी क्रान्तं विजगाहे नभःसरः ॥ १७८ तमो निःशेषमुद्भूय जगदाप्लावयन्करैः । प्रालेयांशुस्तदा विश्वं सुधामयमिवातनोत् ॥ १७९ तमो दूरं विषूयापि विधुरासीत्कलङकवान् । निसर्गजं तमो नूनं महतापि सुदुस्त्यजम् ।। १८०
महापुराण
यानंतर जगाला आनंदित करणाऱ्या किरणानी रात्रीच्या अंधाराला फार दूर घालविणारा आणि सर्व जगाला जणु दुधाने लोकाना धुवून स्वच्छ करीत आहे असा चन्द्र उदयाला आला ।। १७४ ।।
जसा उत्तम राजा आपल्या अखंड देशाला प्रेमाने धारण करतो व सर्व प्रजाना आनंदित करतो तसे ह्या चन्द्रानें देखिल आपल्या लाल रंगाने युक्त अशा अखण्ड गोल बिम्बाला धारण केले होते. जसा राजा सर्व प्रजेपासून कर घेतो तसे या चन्द्राने चोहीकडे आपले किरण पसरले व तो उदयाला आला ।। ११५ ।।
ज्याने हरिणाला ओढले आहे अशा सिंहाप्रमाणे हरिणाचे चिह्न धारण केलेल्या चन्द्राला पाहून हत्तींच्या कळपाप्रमाणे असलेला असा फार मोठा अंधाराचा समूह पळून गेला अर्थात् अंधार नाहीसा झाला ।। १७६ ।।
चन्द्राच्या अमृताची कान्ति धारण करणारा असा प्रकाशाचा प्रवाह चोहोकडे पसरला होता व त्यात चान्दण्यांचा समूह शोभत होता. बुडबुड्यानी सहित आकाशगंगेचा प्रवाह जणु पसरल्याप्रमाणे शोभा उत्पन्न झालेली होती ।। १७७ ॥
जसा एखादा तरुण हंस आपल्या सहचरीसह सरोवरात शेवाळाचा शोध करीत विहार करतो तसा चन्द्ररूपी तरुण हंस आपल्या तारकारूपी सहचरीला बरोबर घेऊन आकाशरूपी सरोवरात अंधाररूपी शेवाळाला हुडकीत विहार करीत आहे ।। १७८ ॥
ज्याचे किरण शान्त-थंड आहेत अशा चन्द्राने सगळा अंधार आपल्या किरणानी नाहीसा केला व त्याने सर्व विश्वाला जगाला जणु अमृतमय केले ॥ १७९ ॥
या चन्द्राने सगळा अंधार नाहीसा केला तरीही तो कलङ्कयुक्तच राहिला. यावरून आम्हाला असे वाटते की, मोठ्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वाभाविक असलेले तम- काळोखी - अज्ञान हे ते नष्ट करू शकत नाहीत असे वाटते ॥ १८० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org