Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०८)
महापुराण
(३५-२०४
कर्णोत्पलनिलीनालिकुलकोलाहलस्वनः । उपजेपे किमु स्त्रीणां कर्णजाहे मनोभुवा ॥ २०४ स्तनाङ्गरागसम्म> परिरम्भोऽतिनिर्दयः । ववृधे कामिवृन्देषु रभसश्च कचग्रहः ॥ २०५ आरक्तकलुषा दृष्टिर्मुखमापाटलाधरम् । रतान्ते कामिनामासीत्सीत्कृतं वासकृत्कृतम् ॥ २०६ पुष्पसंमर्दसुरभीरालस्तजघनांशुका । सम्भोगावसतौ शय्या मिथुनान्यध्यशेरत ॥ २०७ कैश्चिद्वीरभटै विरणारम्भकृतोत्सवः । प्रियोपरोधान्मन्देच्छरप्यासेवि रतोत्सवः ॥ २०८ केचित्कीर्त्यङ्गनासङ्गसुखसङ्गकृतस्पहाः । प्रियाङ्गनापरिष्वङ्गमङ्गीचक्रुर्न मानिनः ॥ २०९ निजितारिभटै ग्याः प्रिया नास्माभिरन्यथा । इति जातिभटाः केचिन्न भेजुः शयनान्यपि ॥२१० शरतल्पगतानल्पसुख सङ्कल्पतः परे । नाभ्यनन्दन्प्रियातल्पमनल्पेच्छा भटोत्तमाः॥ २११
कानावर ठेवलेल्या कमलात दडलेल्या भुंग्याच्या गुंजारवानी मदनाने स्त्रियांच्या कानांच्या मुळाजवळ काही गुप्त गोष्ट जणु सांगितली असावी ।। २०४ ।।
स्तनाना लावलेल्या उटण्याला पुसून टाकणारे अतिशय निर्दय-गाढ आलिङ्गन आणि वेगाने केश पकडणे या दोन क्रिया कामिजनात फार वाढल्या ।। २०५ ॥
स्त्रीसंभोगानंतर कामिजनांचे डोळे थोडेसे लाल काळसर झाले आणि तोंड ज्यात खालचा ओठ किञ्चित् गुलाबी झाला आहे असे बनले. तसेच ज्यात वारंवार सीत्कार शब्द होत आहे असे झाले ।। २०६ ॥
संभोग समाप्त झाल्यानंतर पुष्पांच्या चुरगाळण्याने सुगन्धित व जिच्यावर ढुंगणावरचे वस्त्र गळून पडले आहे अशा शय्येवर ती जोडपी त्यावेळी झोपली ।। २०७॥
त्यावेळी पुढे होणाऱ्या युद्धारंभाचे उत्साहात ज्याचे मन गढून गेले आहे असे व ज्याची इच्छा मंद आहे अशा वीरभटानी स्त्रियांच्या आग्रहाने इच्छा मंद असताही संभोगाच्या उत्सवाचे सुख अनुभविले ॥ २०८ ।।
कीर्तिरूपी स्त्रीच्या आलिंगनसुखाची ज्यांनी इच्छा धारण केली आहे अशा काही अभिमानी योद्धयांनी आपल्या प्रियस्त्रियांच्या आलिंगनांचा आदर केला नाही ।। २०९ ।।
ज्यांनी शत्रूचे वीर योद्धे जिंकले आहेत अशा प्रकारच्या आम्हाकडून स्त्री भोगली जावी, नाही तर तिला भोगू नये असा विचार करून कित्येक कुलीन वीरानी शयनाचाही त्याग -केला ॥ २१० ॥
ज्यांची इच्छा मोठी-उदात्त आहे अशा कित्येक महायोद्धयानी बाणांच्या शय्येवर झोपण्याने फार मोठे सुख प्राप्त होते असा संकल्प केला व त्यानी स्त्रीशय्येची इच्छा धरली नाही ।। २११॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org