Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-२४२)
महापुराण
जयति दिविजमाथैः प्राप्तपूर्जाद्ध रहेन् । घुतदुरितपरागो वीतरागोऽपरागः ॥ कृतनतिशतयज्वप्रज्वलन्मौलिरत्नच्छुरित रुचिररोचिर्मञ्जरी पिञ्जराङघ्रिः ॥ २३८ जयति जयविलासः सूच्यते यस्य पौष्पर लिकुलरुत गर्भे निर्जितानङ्गमुक्तैः ॥ अनुपदयुगमस्त्रैर्भङगशोकादिवाविष्कृतकरुणनिनादैः सोऽयमाद्योजिनेन्द्रः ॥ २३९ जयति जितमनोभूर्भूरिधाम्ना स्वयम्भूजिनपतिरपरागः क्षालितागः परागः ॥ सुरमुकुट विटङ्कोढपादाम्बुजश्रीजंगद जगदगारप्रान्तविश्रान्तबोधः ॥ २४० जयति मदनबाणैरक्षतात्मापि योऽधात्रिभुवनजयलक्ष्मीकामिनीं वक्षसि स्वे ॥ स्वयमवृत च मुक्तिप्रेयसी यं विरूपाप्यनवमसुखताति तन्वती सोऽयमर्हन् ॥ २४१ जयति समरभेरीभैरवारावभीमम् । बलमरचि न कूजच्चण्डको दण्डकाण्डम् ॥ भृकुटिकुटिलमास्यं येन नाकारि वोच्चैर्मनसिजरिपुघाते सोऽयमाद्यो जिनेन्द्रः ॥ २४२
नमस्कार करणाऱ्या देवेन्द्राच्या चमकणाऱ्या किरोटातील रत्नांच्या पसरलेल्या सुन्दर कान्तींच्या मंजरीनी ज्यांचे पाय पिंगट झाले आहेत व देवेन्द्राकडून ज्याना पूजेचा महोत्सव प्राप्त झालेला आहे, ज्यानी पातकांची धूळ उडविली आहे व विषयप्रीति ज्यांची नष्ट झाली आहे, असे रागद्वेषादिदोषानी रहित अर्हत्परमेश्वर नेहमी उत्कर्ष पावत आहेत ।। २३८ ।।
( ३.१३
ज्यांच्या आत भुंगे गुंजारव करीत आहेत आणि त्यामुळे असे वाटू लागतें की मदन जिंकला गेल्यामुळे त्यानें पराजयाच्या शोकाने करुणा उत्पन्न होईल असे ध्वनि बाहेर काढले आहेत आणि आपली फुलांची अस्त्रे तो आदिप्रभूंच्या चरणावर टाकून जात आहे असे सूचित होत आहे. अशा जयविलासाने युक्त असलेले आदिप्रभु उत्कर्षाला पावत आहेत ।। २३९ ।।
ज्यानी कामदेवाला जिंकले आहे व ज्याचे तेज फार मोठे आहे, गुरूच्या साहाय्यावाचूनच ज्यानी विश्वाला जाणले असे भगवान् स्वयंभू आहेत व जिनपति आहेत, ते रागद्वेषरहित आहेत, त्यांनी पापरूपी धूळ धुऊन टाकली आहे, त्यांच्या चरणकमलांची शोभा देवानी आपल्या मुकुटांच्या अग्रभागावर धारण केली आहे, लोक व अलोकरूपी घराच्या शेवटी त्यांचा बो- केवलज्ञान विश्रान्ति घेत आहे असे आदिजिनेश्वर सर्वोत्कर्षाला पावले आहेत ॥ २४० ॥
मदनाच्या बाणानी ज्यांचा आत्मा खंडित झाला नाही, तथापि ज्यानी त्रैलोक्य जयलक्ष्मीरूप स्त्रीला आपल्या वक्षःस्थलावर धारण केले आहे व विरूप- कुरूप असूनही दुसरा अर्थ अमूर्तिक असूनही अत्यंत उत्कृष्ट सुखसमूहाला देणारी अशा मुक्ति- लक्ष्मीने ज्याना स्वयंवरले ते प्रभु सर्वोत्कर्षाला पावत आहेत ॥ २४१ ॥
भयंकर टंकार शब्द करणारा धनुष्यसमूह ज्यांच्याजवळ आहे व युद्धाच्या नगाऱ्यांच्या भयंकर आवाजानी जे भयंकर दिसते अशा सैन्याची रचना ज्यानी केली नाही, ज्यानी भुवया वाकड्या करून आपले मुख भयंकर केले नाही तथापि ज्यानी फार बलवान् अशा मदनशत्रूचा नाश केला ते आदिनाथ प्रभु सर्वोत्कर्ष युक्त आहेत, जयवन्त आहेत ॥ २४२ ॥
म. ४०
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org