Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३१८)
महापुराण
(३६-१७
कराग्रविधृतं खड्गं तुलयकोऽप्यभाद्भटः । प्रतिमित्सुरिवानेन स्वामिसत्कारगौरवम् ॥ १७ महामुकुटबद्धानां साधनानि प्रतस्थिरे । पादातहास्तिकाश्वीयरथकटयापरिच्छवैः ॥ १८ बभुर्मुकुटबद्धास्ते रत्नांशूदग्रमौलयः । सलीला लोकपालानामंशा भुवमिवागताः ॥ १९ परिवेष्टय निरैयन्त पार्थिवाः पृथिवीश्वरम् । दूरात्स्वबलसामग्री दर्शयन्तो यथायथम् ॥ २० प्रत्यग्रसमरारम्भसम्भवोद्धान्तचेतसः । भटीराश्वासयामासुर्भटाः प्रत्याय्य धीरितैः ॥ २१ भूरेणवस्तदाश्वीयखुरोद्धृताः खलखिनः । क्षणविनितसम्प्रेक्षाः प्रचक्रुरमराङ्गनाः ॥ २२ रजःसन्तमसे रुखविक्चके व्योमलङ्किनि । चक्रोद्योतो नृणां चक्रे दृशः स्वविषयोन्मुखीः ॥ २३ समुद्भटरसप्रायैर्भटालापमहीश्वराः । प्रयाणके धृति प्रापुर्जनजल्परपीवृशः ॥ २४
दुसऱ्या एका वीरानं आपल्या हातात तरवार तोलून धरून तिच्याद्वारे आपल्या मालकाने जो आपला सत्कार केला त्याचे वजन किती मोठे आहे हे जणु तो मापीत आहे असे दिसले ॥ १७ ॥
__ याप्रमाणे महामुकुटबद्ध राजांची पायदळे, हत्तींचे समूह, घोड्यांचे सैन्य, रथसमूह, वगैरेनी युक्त अशी सैन्ये प्रयाण करू लागली ॥ १८ ।।
___ रत्नांच्या किरणांनी ज्याचे मुकुट ऊंच भासत आहेत असे ते मुकुटबद्ध राजे जणु लोक पालांचे काही अंश भूभीवर लीलेने आले आहेत असे वाटले ।। १९ ॥
ते सर्व राजे पृथ्वीप्रभु भरताला आपली सैन्याची सामग्री जशी असेल तशी जणु दूरून दाखवित आहेत असे त्याला दोन्ही बाजूनी घेरून जाऊ लागले ॥ २० ॥
पुनः नवीन युद्धाचा आरंभ होईल अशा विचाराने ज्यांची मने घाबरली आहेत अशा वीरांच्या स्त्रीयांना वीरांनी 'युद्धास भिण्याचे कारण नाही. आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे ' अशी धैर्याची वचने बोलून व त्यांची खात्री करून त्यांना धैर्ययुक्त केले ॥ २१ ॥
त्यावेळी घोड्यांच्या खरानी वर उडविलेल्या व आकाशात उल्लंघणान्या जमिनीच्या धुळीनी काही क्षणपर्यन्त देवस्त्रियांना पाहण्यात विघ्न उत्पन्न केले. त्या धुळीचे उपशमन होईपर्यन्त सैन्याची शोभा त्यांना नीट दिसली नाही ॥ २२ ॥
ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत व जो आकाशात जाऊन पसरला आहे अशा धुराळयाने चोहीकडे दाट अंधार उत्पन्न केला. तेव्हा चक्ररत्नाच्या प्रकाशाने लोकांच्या नेत्राना आपल्या विषयाकडे वळविले. चक्ररत्नाच्या प्रकाशाने त्यांना सर्व पदार्थ चांगले दिसू लागले ॥ २३ ॥
रस्त्यात अतिशय वीररसानी भरलेली वीरांची परस्पराशी भाषणे होत होती व इतर लोकांची देखील अशीच उत्कट भाषणे होत होती ती ऐकून राजे युद्धप्रयाणात उत्साहित होत असत ॥ २४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org