Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२०)
महापुराण
(३६-३३
इति माध्यस्थ्यवृत्त्य के जनाः श्लाघ्यं वचो जगुः । पक्षपातहताः केचिस्त्वपक्षोत्कर्षमुज्जगुः ॥३३ एवंप्रापर्जनालापमहीनाथा विनोदिताः । द्रुतं प्राप्तास्तमुद्देशं यत्र वीराग्रणीरसौ ॥ ३४ । दोर्वपं विगणय्यास्य दुर्विलडध्यमरातिभिः । त्रेसुः प्रतिभटाः प्रायस्तस्मिन्नासन्नसन्निधौ ॥ ३५ इत्यभ्यणे बले जिष्णोर्बलं भुजबलीशिनः । जलमब्धेरिवाक्षुभ्यद्वीरध्वाननिरुद्धदिक् ॥ ३६ अथोभयबले वीराः सन्नद्धगजवाजयः । बलान्यारचयामासुरन्योन्यं प्रयुयुत्सया ॥ ३७ तावच्च मन्त्रिणो मुख्या सम्प्रधाविदन्निति । शान्तये नानयोयुद्धं ग्रहयोः ऋरयोरिव ॥ ३८ चरमाङ्गाधरावेतो नानयोः काचनक्षतिः । क्षयो जनस्य पक्षस्य व्याजेनानेन जम्भितः ॥ ३९ इति निश्चित्य मन्त्रज्ञा भीत्वा भूयो जनक्षयात् । तयोरनुमति लब्ध्वा धम्यं रणमघोषयन् ॥ ४०
__ असे मध्यस्थ वृत्तीने काही लोकांनी प्रशंसनीय भाषण केले. पण जे पक्षपाताने दूषित झाले होते असे काही लोक स्वपक्षाच्या उत्कर्षाविषयीच बोलू लागले ॥ ३३ ॥
याप्रमाणे अनेक लोकांच्या निरनिराळ्या भाषणानी ज्यांचे मन आनंदित झाले, ज्यांच्या मनाची करमणूक झाली असे राजे ज्या ठिकाणी वीरांचा पुढारी बाहुबली कुमार होता तेथे शीघ्र गेले ॥ ३४ ॥
बाहुबली कुमाराच्या अगदी जवळ आपण आलो आहोत असे जेव्हा भरताच्या वीर लोकाना समजले तेव्हा या बहुबलीच्या भुजांचा दर्प शत्रूकडून उल्लंघण्यास शक्य नाही असे त्याना वाटले व ते प्रायः घाबरून गेले ॥ ३५ ॥
जेव्हा भरताचे सैन्य जवळ आले तेव्हा जसे समुद्राचे पाणी आपल्या गर्जनेने दिशा व्याप्त करून क्षुब्ध होते तसे बाहुबलीचे सैन्य क्षुब्ध होऊन वीरगर्जना करू लागले. आपल्या गर्जनानी त्यानी दिशा व्याप्त केल्या ॥ ३६ ।।
या नंतर एकमेकाशी लढण्याच्या इच्छेने दोन्ही सैन्यामध्ये हत्ती, घोडे युद्धासाठी सज्ज केले गेले व सैन्याची योग्य रचना केली गेली आणि वीर युद्धासाठी सज्ज झाले ॥ ३७ ॥
त्यावेळी दोन क्रूर ग्रहाचे एकत्र येणे जसे शांतीला कारण होत नाही तसे या दोघांचे युद्ध शान्तीला कारण होणार नाही असा विचार मुख्यमंत्र्यानी केला व ते याप्रमाणे बोलले ॥ ३८॥
श्रीबाहुबलि आणि भरतेश्वर हे दोघे चरमशरीरधारक आहेत म्हणून यांच्या शरीराला कोणताही अपाय होणार नाही. परन्तु यांची बाजू घेणाऱ्या लोकांचा मात्र या युद्धाच्या निमित्ताने क्षय होण्याची वेळ प्राप्त झाली आहे ॥ ३९ ॥
याप्रमाणे त्या मुख्यमंत्र्यानी निश्चय केला व युद्ध झाले तर मोठा जनक्षय होईल या भीतीने त्यानी त्या दोघांची अनुमति मिळविली आणि त्यानी या दोघाचे धर्मयुद्ध होईल अशी घोषणा केली, दौंडी पिटविली ।। ४० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org