Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
षत्रिंशत्तमं पर्व ।
अथ दूतवचरचण्डमरुदाघातपूर्णितः । प्रचचाल बलाम्भोधिजिष्णोरारुध्य रोदसी ॥१ साङग्रामिक्यो महाभेर्यस्तवा धीरं प्रदध्वनः । सुध्वानः साध्वसं भेजः खङ्गाव्यप्रा नभश्चराः ॥२ बलानि प्रविभक्तानि निधीशस्य विनिर्ययुः । पुरः पादातमाश्वीयमारादाराच्च हास्तिकम् ॥३ रथकटया परिक्षेपो बलस्योभयपक्षयोः । अग्रतः पृष्ठतश्चासीदूध्वं च खचरामराः ॥४ । षडङ्गबलसामग्य सम्पन्नः पार्थिवैरमा। प्रतस्थे भरताधीशो निजानुजजिगीषया ॥५ महान्गजघटाबन्धो रेजे सजयकेतनः । गिरीणामिव सङ्कातः सञ्चारी सहशाखिभिः ॥६ श्च्योतन्मदजलासारसिक्तभूमिमदद्विपैः । प्रतस्थे रुद्धदिक्चक्रः शलैरिव सनिर्झरैः॥७ जयस्तम्बरमा रेज़स्तुङ्गाः शृङ्गारिताङ्गकाः । सान्द्रसन्ध्यातपाक्रान्ताश्चलन्त इव भूधराः ॥८
यानन्तर दूताच्या भाषणरूपी प्रचण्ड वाऱ्याच्या आघाताने प्रेरलेला तो चक्रवर्तीचा सेनासमुद्र, पृथ्वी व आकाश याना व्यापून पुढे प्रयाण करू लागला ॥१॥
त्यावेळी युद्धाचे मोठे नगारे गंभीरपणाने वाजू लागले. त्यांच्या त्या आवाजांनी तरवार हातात घेण्यासाठी व्यग्र झालेले विद्याधर तेव्हा भययुक्त झाले ॥२॥
निधींचा स्वामी अशा चक्रवर्तीची ती सैन्ये वेगवेगळ्या विभागाने युक्त होऊन चालू लागली. सर्वात पुढे पायदळ चालू लागले. त्यानंतर काही दूर घोडेस्वारांचे सैन्य आणि त्याहून काही दूर अन्तराने हत्तींचे सैन्य चालले होते ॥ ३ ॥
सैन्याच्या दोन्ही बाजूनी रथांचा समूह चालत होता आणि पुढे पाठीमागे आणि वर विद्याधर आणि देव चालू लागले ॥ ४ ॥
___ याप्रमाणे सहा प्रकारच्या सैन्यसामग्रीने युक्त असा भरतप्रभु आपल्या भावाला जिंकण्याच्या इच्छेने अनेक राजासह निघाला ॥ ५ ॥
जयध्वजासह असलेला हत्तींचा मोठा समूह जणु वृक्षानी युक्त असा पर्वतांचा समुदाय चालत आहे असा भासला ॥ ६ ॥
गळणाऱ्या मदजलाच्या वृष्टीने ज्यानी जमीन भिजविली आहे व ज्यांच्यावर झरे वाहत आहेत असे जणु पर्वत की काय आणि ज्यांनी दिशामंडल अडविले आहे अशा मत्त हत्तीसह भरतप्रभु प्रयाण करू लागला ॥ ७॥
__ ज्यांची शरीरे शृंगारली आहेत, असे उंच हत्ती दाट सायंकालच्या लाल उन्हाने युक्त असे जणु चालत असलेले पर्वत आहेत असे शोभू लागले ॥ ८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org