Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-२४९)
महापुराण
इति समुचितरुच्चैरुच्चावचैर्जयमङगलः । सुघटितपदभूयोऽमीभिर्जयाय विबोधितः ॥ शयनममुचन्निद्रापायात्स पार्थिवकुञ्जरः । सुरगजइवोत्सङगं गङगाप्रतीरभुवं शनैः ॥ २४८ जयकरिघटाबन्ध रुन्धन्दिशो मवविह्वलैः । बलपरिवृढरारूढश्रीरुदूढपराक्रमः॥ नृपकतिपयैरारादेत्य प्रणम्य दिक्षितो । भुजबलियुवा भेजे सैन्यैर्भुवं समरोचिताम् ॥ २४९
इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे कुमारबाहुबलिरणोद्योगवर्णनं नाम पञ्चत्रिंशत्तमं पर्व ॥ ३५॥
याप्रमाणे ज्यात उत्तम उत्तम पदरचना केली आहे व अनेक प्रकारानी उत्कृष्ट व राजाना योग्य अशा मंगलगीतानी व पुनः या जिनाष्टकाने बाहुबली राजा जागृत झाला व जसा देवांचा ऐरावत हत्ती निद्रापूर्ण झाल्यामुळे हळु हळू गंगेच्या तीरप्रदेशाचा त्याग करतो तसा या श्रेष्ठ बाहुबली राजाने शयनाचा त्याग केला ।। २४८ ।।
मदाने व्याकुल झालेल्या विजयी हत्तींच्या समूहानी सर्व दिशाना व्यापणारा व सैन्यातील श्रेष्ठ अशा योद्धयानी ज्याचा पराक्रम खूप वाढला आहे व कांही राजानी जवळ येऊन ज्याचे दर्शन घेतले आहे, असा तो तरुण भुजबली राजा आपल्या सैन्याला घेऊन युद्ध करण्यास योग्य अशा भूमीवर आला ॥ २४९ ॥
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यांनी रचलेल्या आर्ष त्रेसष्ट लक्षणयुक्त श्रीमहापुराण संग्रहातील कुमार बाहुबलीच्या रणोद्योगाचे वर्णन करणारे हे पस्तीसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org