Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-२३२)
कतरकतमे नाक्रान्तास्ते बलैर्बलशालिनः । भुजबलमिदं लोकः प्रायो न वेत्ति तवाल्पकः ॥ भरतपतिना सार्धं युद्धे जयाय कृतोद्यमः । नृपवर भवान्भूयाद्भर्ता नृवीर जयश्रियः ॥ २२८ रविरविरलान व्रातानिवाश्रमशाखिनाम् । तुहिनकणिकाव्रातानाशु प्रमृज्य करोत्करैः ॥ अयमुदयति प्राप्तानन्वैरितोऽम्बुजिनीवनैः । उदयसमये प्रत्युद्यातो धृतार्घमिवाम्बुजेः ॥ २२९ अयमनुसरन्कोकः कान्तां तन्टान्तरशायिनीम् । अविरलगलद्वाष्पव्याजादिवोत्सृजती शुचम् ॥ विशति बिसिनी पत्रच्छलां सरोजसरस्तटीम् । सरसिजरजः कोणी पक्षौ विधूय शनैः शनैः ॥ २३० जर बिसिनो कन्दच्छायामुषस्तरलास्त्विषः । तुहिन किरणो दिक्पर्यन्तादयं प्रतिसंहरन् ॥ अनकुमुदिनीखण्डं तन्वन् करानमृतश्च्युतः । द्रढयति परिष्वङ्गासङ्ग वियोगभयादिव ।। २३१ तिमिरकरिणां यूथं भित्त्वा तदत्रपरिप्लुतामिव । तनुमयं बिभ्रच्छोणां निशाकरकेसरी ॥ वनमिव नभः क्रान्त्वास्ताद्रेर्गुहागहनान्यतः । श्रयति नियतं निद्रासङ्गाद्विजिह्मिततारकः ॥२३२
महापुराण
( ३११
हे नृपश्रेष्ठा, तुझ्या सैन्यानी कोणते कोणते राजे जिंकले नाहीत बरे ? हे मनुष्यातील श्रेष्ठवीरा, प्रायः हे तुच्छ लोक तुझ्या बाहूंचे बल जाणत नाहीत. हे प्रभो, तू आता भरतपति अशा भरतराजाबरोबर लढून युद्धात जय मिळविण्यास उद्युक्त झाला आहेस. हे नृपश्रेष्ठा, तू जयलक्ष्मीचा भर्ता - स्वामी हो ।। २२८ ॥
अविरल-सारखे पडत असलेले जणु अश्रुसमूह की काय ? असे जे दवांचे कणसमूह त्याना आपल्या किरणसमूहानी पुसून हा सूर्य उदयाला येत आहे व ज्याना आनंद प्राप्त झाला आहे अशी कमलवने सूर्याच्या उदयसमयी कमलांचा अर्ध घेऊन त्याचे स्वागत करीत आहेत असे वाटते. असा हा सूर्य उदयास येत आहे ।। २२९ ।।
निरन्तर गळणाऱ्या अश्रूंच्या मिषाने जणु शोकाला बाहेर टाकीत आहे अशी व सरोवराच्या दुसन्या तटावर निजलेली अशा आपल्या मादीकडे जाणारा हा कोकपक्षी आपले कमलाच्या परागानी भरलेले दोन पंख हलवून कमलिनीच्या पानानी आच्छादित झालेल्या कमलयुक्त सरोवराच्या तीराकडे हळू हळू जात आहे ॥ २३० ॥
जुनाट झालेला जो कमलिनीचा शुभ्र कंद त्याची कान्ति हरण करणाऱ्या व अमृतस्रवणाऱ्या आपल्या किरणाना दिशांच्या अन्तापासूत हरण करणारा हा चन्द्र शुभरात्री विकासी कमलाना जणु वियोगभीतीमुळे आलिंगनाचा संबन्ध दृढ करीत आहे ।। २३१ ।।
Jain Education International
या चन्द्ररूपी सिंहाने अंधाररूपी हत्तीच्या कळपांचा संहार केला व त्याच्या रक्तानी सर्व बाजूनी याचे शरीर भरून गेले व त्यामुळे जणु हा लाल शरीराचा बनला - दिसू लागला. यानन्तर जणु वनाप्रमाणे भासणारे आकाश उल्लंघून या चन्द्रसिंहाने अस्तपर्वताच्या गुहानी युक्त अरण्याचा मार्ग आश्रयिला आणि निद्रेमुळे ज्याचे तारारूपी डोळे थोडेसे म्लान झाले आहेत असा होऊन त्यांचा ( त्या अस्तपर्वताच्या ) गुहावनांचा खरोखर आश्रय घेत आहे असे वाटते ।। २३२ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org