________________
३५-२१९ )
महापुराण
स्वकामिनीभिरारब्धवीरालापैर्भटः परैः । विभावरी विभातापि सा नावेदि रणोन्मुखैः ॥ २१२ केचिद्रण रसासक्तमनसोऽपि पुरः स्थितम् । कान्तासङ्गरसं स्वैरं भेजुः समरसा भटाः ॥ २१३ प्रहारकर्कशोदष्टदशनच्छदनिष्ठुरः । रतारम्भो रणारम्भनिर्विशेषो न्यषेवि तैः ॥ २१४ रतानुवर्तनैर्गाढं परिरम्भर्मुखार्पणः । मनांसि कामिनां जन्तुः कामिन्यस्ताः स्मरातुराः ॥ २१५ दुगवीक्षितैः सान्तहर्मन्मनजल्पितेः । अकाण्डरुषितैश्चण्डेविवृत्तं रसमश्रुभिः ॥ २१६ तासामकृतकस्नेहगर्भः कृतककैतवैः । रसिकोऽभूद्रतारम्भः सम्भोगान्तेषु कामिनाम् ॥ २१७ तेषां निषुवनारम्भमतिभूमिगतं तदा । सन्द्रष्टुमसहन्तीव पर्यवर्तत सा निशा ।। २१८ अलं बत चिरं रवा दम्पती ताम्यथो युवाम् । लम्बितेन्दुमुखी तस्थावितीवापर दिग्वधूः ॥ २१९
(३०९
युद्धाला जाण्यासाठी उत्सुक झालेले कांही योद्धे आपल्या स्त्रियाबरोबर वीर योद्ध्यांच्या गोष्टी सांगण्यात तल्लीन झाले त्यामुळे त्याना रात्र उजाडलेली माहितच झाली नाही ॥ २१२ ॥
कांही योद्धे रणलक्ष्मीवर आसक्त झाले होते. तथापि पुढे आलेल्या कान्तासंभोगाच्या रसात व युद्धरसात समानता मानून त्यांनी स्त्रीसंभोगरसाचा यथेच्छ अनुभव घेतला ।। २१३ ॥
त्या योद्ध्यांनी रणाच्या प्रारंभाप्रमाणेच संभोगाचा प्रारंभ केला होता. रणाचा प्रारंभ एकमेकाना प्रहार करण्यामुळे कठोर असतो तसा संभोगाचा प्रारंभही परस्पराना प्रहार करणे अर्थात् केस पकडणे, नखानी क्षत करणे यामुळे कठोर होता. जसा रणाचा प्रारंभ ओठ चावण्याने निर्दय असतो, तसाच संभोगाचा प्रारंभही ओठांच्या चुम्बनादिकानी निर्दय होता. अशा संभोगरसाचे त्या योद्ध्यानी सेवन केले ॥ २१४ ॥
मदनाने उत्कण्ठित झालेल्या त्या स्त्रियानी रतिकाली पतीच्या इच्छेप्रमाणे वागणे, गाढ आलिंगन देणे, चुम्बनासाठी मुख पुढे करणे वगैरे क्रियानी पतीच्या मनाला वश केले ।। २१५ ।।
वाकड्या नजरेने बघणे, थोडेसे हसून अस्पष्ट बोलणे, मध्येच क्रोधयुक्त होणे, एकदम जोराने तोंड फिरविणे, भुवया वाकड्या करणे, स्वाभाविक प्रीतीने अनेक कृत्रिम भाव वरून दाखविणे वगैरे समागमाच्या वेळी केलेले जे स्त्रियांचे मनोहर व्यापार त्यानी विलासी पुरुषांचा 'पुढील सुखप्रसंग मोठा रसयुक्त आल्हाददायक झाला ।। २१६-२१७ ।।
त्यावेळी त्या विलासी पुरुषांच्या अमर्याद झालेल्या सुखोद्योगास पाहून जणु कंटाळली अशी ती रात्र परतली अर्थात् पाहाटेची वेळ झाली ॥। २१८ ॥
फार वेळ क्रीडा केली आता पुरे करा, तुम्ही दोघेही पतिपत्नी म्लान व्हाल जणु असे बोलून तिने आपले चन्द्ररूपी तोंड खाली केले आहे अशी पश्चिमदिशारूपी स्त्री उभी राहिली ॥ २१९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org