Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३१०)
महापुराण
(३५-२२०
विघटय्य रथाङगानां मिथुनानि मियोंऽशमान् । तापेन तत्कृतेनेव परीतोऽभ्युदियाय सः ॥ २२० तावदासीदिनारम्भो गतं नेशं तमो लयम् । सहस्रांशुर्दिशं प्राची परिरेभे करोत्करैः ॥ २२१ किरणस्तरुणैरेव तमः शार्वरमुद्धृतम् । तरणेः करणीयं तु दिनश्रीपरिरम्भणम् ॥ २२२ कोककान्तानुरागेण समं पद्माकरं श्रियम् । पुष्णनुष्णांशुरुद्यच्छन् अमुष्णात्कौमुदीं श्रियम् ॥ २२३ तमःकवाटमद्घाटय विडमुखानि प्रकाशयन् । जगदुद्धाटिताक्षं वा व्यधादुष्णकरः करैः ॥ २२४ प्रातस्तरामथोत्थाय पद्माकरपरिग्रहम् । तन्वन्भानुः प्रतापेन जिगीषोवृत्तमन्वगात् ॥ २२५ सुकण्ठाः पेठुरत्युच्चः प्रभोः प्राबोधिकास्तदा । स्वयं प्रबुद्धमप्येनं प्रबोधनयुयुक्षवः ॥ २२६ अशिशिरकरो लोकानन्दी जनैरभिनन्दितः । बहुमतकरं तेजस्तन्वनितोऽयमदेष्यति ॥ नवर जगतामुद्योताय त्वमप्युदयोचितम् । विधिमनुसरन् शय्योत्सङ्ग जहीहि मदे श्रियः ॥ २२७
पूर्व दिवशी सूर्याने चक्रवाकपक्ष्यांच्या जोडप्याना आपसात एकमेकाना वियुक्त केले होते, वेगवेगळे केले होते. त्यामुळे त्यानी केलेल्या तापाने जणु व्याप्त होऊन तो सूर्य उगवला ।। २२० ॥
तितक्यात दिवसाला प्रारम्भ झाला व रात्रीचा अन्धार नाहीसा झाला व हजारो किरणांचा धारक सूर्य उगवला आणि त्याने आपल्या किरणसमूहाने पूर्व दिशेला आलिंगिले॥२२१॥
सूर्याने आपल्या तरुण कठोर किरणानी रात्रीचा अंधार नाहीसा केला व आता दिवस- श्रीला आलिंगन करणे हेच फक्त कर्तव्य राहिले ।। २२२ ॥
सूर्यानेच कवीच्या प्रेमाबरोबर कमलसमूहाच्या शोभेला पुष्ट केले आणि रात्रिविकासी कमलाच्या शोभेला त्याने नष्ट केले, हरण केले ।। २२३ ॥
___ अंधाररूपी दरवाजा उघडून दिशांची मुखे उज्ज्वल करणाऱ्या सूर्याने आपल्या किरणानी सर्व जगाचे डोळे जणु उघडले असे कार्य केले ॥ २२४ ॥
जसा पराक्रमाने विजयाची इच्छा करणारा राजा प्रातःकाली उठून लक्ष्मीच्या हाताचा स्वीकार करतो तसे हा सूर्य प्रातःकाली उगवला आणि त्याने पद्माकर-सूर्यविकासी कमलांची उत्पत्ति जेथे होते अशा सरोवरांचा स्वीकार केला अर्थात् सरोवरातील कमले विकसित केली ।। २२५ ।।।
ज्यांचा कण्ठ सुरेल आहे, असे बाहुबलीचे भाटजन स्वतः जागृत झालेल्या अशाही या बाहुबली राजास पुनः अधिक जागृत करण्यास उद्युक्त होऊन मोठ्या स्वराने मंगलपाठ म्हणू लागले ॥ २२६ ॥
हे मनुष्यश्रेष्ठा, लोकाना आनंद देणारा व लोकानी ज्याची स्तुति केली आहे असा हा सूर्य सर्व जगाला प्रकाशित करण्यासाठी उदयाला येईल व हे प्रभो आपणही सर्वाना उन्नत करण्यासाठी योग्य विधि करून लक्ष्मीला आनंदित करण्यासाठी आता शय्येच्या मध्यभागाचा त्याग करा ॥ २२७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org