Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-२०३)
महापुराण
(३०७
आलि तमालिक ब्रूहि गतः किन विलक्षताम् । प्रियानामाक्षरः क्षीणैर्मोहान्मय्यवतारितः ॥ १९६ यथा तव हृतं चेतस्तया लज्जाप्यहारि किम् । येन निस्त्रप भूयोऽपि प्रणयोऽस्मासु तन्यते ॥ १९७ सैवानुवर्तनीया ते सुभगम्मन्य मानिनी । अस्थाने योजिता प्रीतिर्जायतेऽनुशयाय ते ॥ १९८ इति प्राणप्रियां काञ्चित्सन्दिशन्ती सखोजने। युवा सादरमभ्येत्य नानुनिन्येऽथ मानिनीम् ॥१९९ चन्द्रपादास्तपन्तीव चन्दनं वहतीव मां । सन्धुक्ष्यत इवामीभिः कामाग्नियंजनानिलैः ॥ २०० तमानयानुनीयेह नय मां वा तदन्तिकम् । त्वदधीना मम प्राणा प्राणेशे बहुवल्लभे ॥२०१ इत्यनङ्गातुरा काचित्सन्दिशन्ती सखी मिथः । भुजोपरोधमाश्लेषि पत्या प्रत्यग्रखण्डिता ॥ २०२ राज्ये मनोभवस्यास्मिन्स्वरं रंरम्यतामिति । कामिनीकलकाञ्चीभिरुदघोषीव घोषणा ॥ २०३
कोणी स्त्री आपल्या मैत्रिणीला सांगत होती की हे सखि, प्रियाने हळू उच्चारिलेल्या व तीच ही आहे अशा भ्रमाने माझ्याकडे लावलेल्या आपल्या गुप्त असलेल्या प्रियेच्या नामाक्षरानी तो प्रिय चकित झाला होता काय ? ते मला खरे सांग ॥ १९६ ।।
दुसऱ्या स्त्रीवर अनुरक्त झालेल्या प्रियाला उद्देशून कोणी एक तरुण स्त्री त्याला असे म्हणते. 'हे निर्लज्जा जिने तुझे मन आकर्षण करून घेतले आहे तिने तुझी लज्जाही हरण करून नेली काय ? आता तू आम्हावर पुनः कां प्रेम करीत आहेस ?' || १९७ ॥
कोणी स्त्री आपल्या पतीला हिणवित होती, हे प्रिय आपण स्वतः सौभाग्यशाली समजत आहात म्हणून मी म्हणते की त्याच मानी स्त्रीची आपण सेवा करा कारण अयोग्यस्थानी योजिलेली प्रीति आपणास पश्चात्तापास कारण होईल. माझ्यावर प्रेम करण्याने आपणास संतापदुःख होईल म्हणून आपण त्या आवडत्या स्त्रीकडे जा ।। १९८॥
याप्रमाणे आपल्या मैत्रिणीसमुदायात बोलणाऱ्या कोणा अहंकारयुक्त स्त्रीला तिचा तरुण पति तिच्याकडे येऊन त्याने आदराने तिचा अनुनय केला नाही काय? अर्थात् अनुनय केलाच ॥ १९९ ॥
कोणी स्त्री आपल्या मैत्रिणीला असे सांगत होती " हे चन्द्राचे किरण मला जणु सन्तप्त करीत आहेत. मला ही चन्दनाची उटी आगीप्रमाणे भाजते व या पंख्याच्या वाऱ्यानी हा कामाग्नि पेटत आहे, यास्तव हे सखि, तू माझ्या पतीला विनवणी करून येथे मजकडे आण किंवा मला तरी त्याच्याकडे ने. माझा पति अनेक वल्लभानी युक्त आहे ॥ २००-२०१॥
याप्रमाणे कामपीडित होऊन कोणी स्त्री आपल्या सखीला आपसात बोलत असता इतक्यात तिचा पति तिथे आला व त्याने नवीन विरहिणी अशा आपल्या पत्नीला आपल्या दोन बाहूंनी पकडून आलिंगन दिले ॥ ॥ २०२ ॥
या मदनाच्या राज्यात मनसोक्त-यथेच्छ क्रीडा करा अशी जणु स्त्रियांच्या मधुर शब्द करणाऱ्या कंबरपट्टयांनी दौंडी पिटविली की काय ? ॥ २०३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org