Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-१८८)
महापुराण
(३०५
भिषजेव करैः स्पृष्टा विशस्तिमिरभेदिभिः । शनर्देश इवालोकमातेनुः शिशिरत्विषा ॥ १८१ इति प्रदोषसमये जाते प्रस्पष्टतारके । सौधोत्सङ्गभुवो भेजुः पुरन्ध्न्यः सहकामिभिः ॥ १८२ चन्दमद्रवसिक्ताग्यः स्त्रग्विण्यः सावतंसिकाः । लसवाभरणा रेजुस्तन्व्यः कल्पलता इव ॥ १८३ इन्दुपावैः समुत्कर्षमागान्मकरकेतनः । तदोवन्वानिवोढेलो मनोवृत्तिषु कामिनाम् ॥ १८४ रमणा रमणीयाश्च चन्द्रपादाः सचन्दनाः । मदाश्च मवनारम्भमातन्वन्रमणीजने ॥ १८५ शशाडकरजैत्रास्त्रस्तर्जयन्निखिलं जगत् । नृपवल्लभिकावासान्मनोभूरभ्यषणयत् ॥ १८६ नास्वादि मदिरा स्वरं ना जत्रे न करेऽपिता । केवलं मदनावेशातरुण्यो भेजुरुकताम् ॥ १८७ उत्सङ्गसगिनी भर्तुः काचिन्मदविणिता । कामिनी मोहनास्त्रेण बतानङ्गेन तजिता ॥ १८८
जसे वैद्य आपल्या हातानी लोकांच्या डोळ्याना स्पर्श करून त्यातील तिमिररोग नाहीसा करतो व त्यामुळे लोकांचे डोळे प्रकाशयुक्त होतात तसे चन्द्राने अंधकाराचा नाश करणाऱ्या आपल्या थंड कांतीच्या किरणानी दिशाना स्पर्श केला व त्यामुळे त्यांच्यातून हळु हळु प्रकाश बाहेर पडू लागला अर्थात् दिशा चन्द्रप्रकाशाने जननेत्राप्रमाणे स्वच्छ कान्तियुक्त झाल्या ॥ १८१॥
याप्रमाणे रात्रीला प्रारंभ झाल्यावर आकाशात तारकांचा समूह स्पष्ट दिसू लागला. तेव्हा स्त्रियानी आपल्या पतीसह प्रासादांच्या वरच्या मजल्यांचा आश्रय घेतला ॥ १८२ ।।
चन्दनाची उटी ज्यांनी आपल्या अंगाला लावली आहे व ज्यांनी आपल्या गळयात माळा घातल्या आहेत, ज्यांचे कान आभूषणानी भूषित झाले आहेत व ज्यांचे इतर अलंकार फार चमकत आहेत अशा त्या सुन्दर स्त्रिया कल्पवल्लीप्रमाणे शोभू लागल्या ॥ १८३ ॥
चन्द्राच्या किरणानी समुद्र जसा मर्यादेचे उल्लंघन करितो, त्याप्रमाणे कामिजनांच्या मनात मदन फार वाढला ॥ १८४ ॥
अन्तःकरणास रमविणारे असे आवडते पति, चन्दनाच्या उटीवर पडलेले चन्द्राचे किरण, मद उत्पन्न करणारे पदार्थ यांनी स्त्रियांच्या मनात कामविकाराची वृद्धि केली ॥१८५॥
चन्द्राचे किरण हेच जगाला जिंकणारी अस्त्रे त्यांनी सर्व जगाला त्रस्त करणाऱ्या मदनाने राजस्त्रियांच्या मंदिरावर आक्रमण केले ॥ १८६ ।।
त्या तरुण स्त्रियांनी यथेच्छ दारु प्राशन केली नाही. तिचा वास घेतला नाही किंवा ती हातातही घेतली नाही पण केवल मनात मदनाचा आवेश उत्पन्न झाल्यामुळे त्या पतिविषयी उत्सुक झाल्या ॥ १८७॥
मदाने उन्मत्त झालेली व आपल्या पतीच्या मांडीवर बसलेली अशा एका स्त्रीला मदनाने आपल्या मोहनास्त्राने घाबरे केले ।। १८८ ।। म.३९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org