Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
( ३५-१८९
सखोवचनमुल्लङ्घ्य भक्त्वा मानं निरर्गला । प्रयान्ती रमणावासं काप्यनङ्गेन धीरिता ॥ १८९ शम्फलीवचनंर्द्वना काचित्पर्यश्रुलोचना । चक्राह्वेव भृशं तेपे नायाति प्राणवल्लभे ।। १९० शून्यगानस्वनैः स्त्रीणामलिज्याकलझङ्कृतैः । पूर्वरङ्गमिवानङ्गो रचयामास कामिनाम् ॥ १९१ गोत्रस्खलनसम्बद्धमन्युमन्यामनन्यजः । नोपक्षिष्ट प्रियोत्सङ्गमनयन्नवसङ्गताम् ॥ १९२ नेन्दुपादैर्धृति लेभे नोशीरैर्नजलार्द्रया । खण्डिता मानिनी काचिवन्तस्तापे बलीयसि ॥ १९३ काचिदुत्तापिभिर्बाणैस्तापितापि मनोभुवा । नितम्बिनी प्रतीकारं नेच्छयविलम्बिनी ॥ १९४ अनुरक्ततया दूरं नीतया प्रणयोचिताम् । भूमि यूनान्यया सोढः सन्देशः परुषाक्षरः ॥ १९५
३०६)
एका स्त्रीने आपल्या मैत्रिणीचे सांगणे मान्य केले नाही, आपला अभिमान तिने बाजूला सारला व ती आपल्या प्रियपुरुषाच्या घराकडे मदनाने तिला धैर्य दिल्यामुळे गेली ।। १८९ ।।
दासीच्या सांगण्याने जिचे मन दुःखी झाले आहे व त्यामुळे जिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली आहे, अशी कोणी स्त्री तिचा पति न आल्यामुळे चक्रवाकीप्रमाणे फार दुःखी झाली ।। १९० ॥
मोहाने बेफाम बनलेल्या स्त्रियांच्या गाण्याने आणि भुंग्यांच्या मधुर गुंजारवाने कामी पुरुषांच्या मनात मदनाने जणु पूर्वरंगाला प्रारंभ केला की काय ? तात्पर्य- कामाने बेहोश होऊन गाणे व भुंग्यांचा गुंजारव याने पुरुषांच्या मनात मदनविकाराला सुरुवात झाली ॥। १९१ ।।
आपल्या पतीने चुकीने अन्य स्त्रीचे नाव घेतल्यामुळे जिच्या मनात कोप उत्पन्न झाला आहे अशा कोण्या नवविवाहित स्त्रीची मदनाने उपेक्षा केली नाही अर्थात् ती रुसली जरी तरीही तिच्या मनाला मदनाने आपल्या बाणांनी घायाळ केले व त्याने तिला तिच्या पतीकडे नेले ॥ ९९२ ॥
जिची मानखंडना झाली आहे अशी कोणी अभिमानी स्त्री अन्तःकरणात ताप अधिक उत्पन्न झाल्यामुळे फारच रागावली. त्यामुळे तिचा राग चन्द्राच्या किरणानी, पांढऱ्या वाळयाने व काळ्या वाळयानेही शान्त झाला नाही ॥ १९३ ॥
कोण्या गंभीर अन्तःकरणाच्या स्त्रीला आपल्या संताप देणाऱ्या बाणानी मदनाने त्रस्त केले होते तरीही तिने धैर्याचा अवलम्ब केला व त्या बाणांचा प्रतीकार केला नाही. तो ताप शान्त करण्याकरिता ती पतीकडे गेली नाही ॥। १९४ ।।
कोण्या तरुण पुरुषाने प्रेमाने भरलेल्या आपल्या अन्यस्त्रीला प्रेम करण्यायोग्य कोणत्या दूर अशा स्थानी नेले होते व तेथे त्याने तिला कठोर शब्दानी आपली आज्ञा कळविली पण ती अतिप्रेमामुळे तिने सहन केली ॥।
१९५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org