Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३५-१५८
तिर्यङमण्डलगत्यैव शश्वद्भानुरयं भ्रमन् । विप्रकर्षाज्जनैर्मूढैरग्राहीव पतन्नधः ॥ १५८ व्यसनेऽस्मिन्दिनेशस्य शुचेव परिपीडिताः । विच्छायानि मुखान्यू हस्त मोरुद्धा दिगङ्गनाः ।। १५९ पद्मिन्यो म्लानपद्मास्या द्विरेफकरुणारुतैः । शोचन्त्य इव संवृत्ता वियोगादहिमत्विषः ॥ १६० सन्ध्यातपततान्यासन्वनान्यस्त महीभृतः । परीतानीव दावाग्निशिखयातिकरालया ॥ १६१ अनुरक्तापि सन्ध्येयं परित्यक्ता विवस्वता । प्रविष्टा वाग्निमारक्तच्छ विरालक्ष्यताम्बरे ॥ १६२ शनैराकाशवाराशिविद्रुमोद्यानराजिवत् । रुरुचे दिशि वारुण्यां सन्ध्यासिन्दूरसच्छविः ॥ १६३ चक्रवाकीमनस्तापदीपनो नु हुताशनः । पप्रथे पश्चिमाशान्ते सन्ध्यारागो जपारुणः ॥ १६४ सन्ध्यारागः स्फुरन्दिक्षु क्षणमंक्षि प्रियागमे । मानिनीनां मनोरागः कृत्स्नो मूर्च्छतिवैकतः ॥ १६५
३०२)
महापुराण
हा सूर्य तिरकस अशा मण्डलाकार गतीनेच नेहमी भ्रमण करीत असतो. पण तो फार लांब गेल्यामुळे मूढलोकानी तो खाली पडत आहे अशी आपली समजूत करून घेतली आहे ।। १५८ ।।
सूर्याच्या या संकटाच्या वेळी जणु शोकाने अंधाराने व्याप्त झाल्या व त्यांची मुखे निस्तेज झाली ॥ १५९ ॥
पीडित झालेल्या या दिशारूपी स्त्रिया
सूर्याच्या वियोगाने ज्यांची कमलरूपी तोंडे म्लान - खिन्न झाली आहेत अशा पधिनी - दिवसा ज्यांची कमले प्रफुल्ल होतात अशा कमलवेली सूर्याच्या वियोगाने जणु भ्रमरांच्या गुंजारवरूपी करुणा उत्पन्न होईल अशा शब्दानी शोक करीत आहेत अशा वाटल्या ।। १६० ।।
सायंकालच्या तांबूस किरणानी व्याप्त झालेली अशी अस्तपर्वतावरील वने अतिशय भयंकर अशा वनाग्नीच्या ज्वालानी जणु वेढली आहेत अशी दिसू लागली ।। १६१ ।।
ही सन्ध्या जरी सूर्यावर प्रेम करीत होती तरीही तिचा त्याने त्याग केला. म्हणून जिची लाल कान्ति आहे अशा तिने अग्नीत प्रवेश केला जणु अशी ती आकाशात दिसू लागली ।। १६२ ॥
यानंतर पश्चिम दिशेकडे हळु हळु शेंदराप्रमाणे सुंदर कान्ति जिची आहे अशी संध्या पश्चिम दिशेत आकाशरूपी समुद्राच्या पोवळयांच्या बगीचांच्या पंक्तीप्रमाणे शोभू लागली ।। १६३ ॥
जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लालभडक अशी संध्याकालाची कान्ति पश्चिम दिशेत जणु चक्रवाकीच्या मनात विरहतापाला वाढविणारा अग्नि आहे की काय अशी पसरली ।। १६४ ।।
Jain Education International
सर्व दिशामध्ये स्फुरण पावणारा वाढणारा हा सन्ध्याकालीनराग- तांबडा प्रकाश प्रिय पतीच्या येण्याच्या वेळचे मानी स्त्रियांच्या मनातील सर्व प्रेम जणु एकत्र जमले आहे की काय असा भासू लागला ।। १६५ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org