Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-७८)
महापुराण
(२९१
शरव्यमकरोद्यस्य शरपातो महाम्बुधौ । प्रसभं मगधादासं क्रान्तद्वादशयोजनः ॥ ७१ विजयाआँचले यस्य विजयो घोषितोऽमरैः । जयतो विजयाद्धेशं शरेणामोघपातिना ॥ ७२ कृतमालादयो देवा गता यस्य विधेयताम् । कृतमस्योभयश्रेणीनभोगजयवर्णनैः ॥ ७३ गुहामुखमपध्वान्तं व्यतीत्य जयसाधनैः । उत्तरां विजया द्रो व्यगाहत तां महीम् ॥ ७४ म्लेच्छाननिच्छतोऽप्याज्ञां प्रच्छाद्य जयसाधनैः । सेनान्या यो जयं प्राप बलादाच्छिद्य तद्धनम् ॥७५ कृतोऽभिषेको यस्यारदभ्येत्य सुरसत्तमैः । यस्याचलेन्द्रकूटेषु स्थलपद्मायितं यशः ॥ ७६ रत्नार्धेः पर्युपासातां यं च स्वर्धन्यदेवते । वृषभाद्रितटे येन टडाकोत्कीर्णं कृतं यशः ॥ ७७ घटदासीकृता लक्ष्मीः सुराः किडकरतां गताः । यस्य स्वाधीनरत्नस्य निधयः सुवते धनम् ॥ ७८
ज्याने बारा योजनपर्यन्तचा प्रदेश ओलांडला आहे, अशा भरतेश्वराच्या बाणाचे पतन समुद्रात असलेले जे मगधदेवाचे निवासस्थान त्याला त्याने भयंकर रीतीने आपल्या तीक्ष्ण बाणाचे निशाण बनविले आहे ॥ ७१ ।।
लक्ष्यसिद्धि करून देण्यासाठी होणारे ज्याचें पतन कधीही व्यर्थ होत नाही अशा बाणाने विजयार्धपर्वताचा स्वामी असलेल्या विजयार्धनामक देवाला जिंकणाऱ्या या भरतेशाच्या विजयाची घोषणा देवानी विजयार्धपर्वतावर केली ।। ७२ ।।
कृतमाल वगैरे देव या भरतेश्वराचे त्यावेळी दास झाले व त्यावेळी भरतेश्वराने दोन्ही श्रेणीच्या विद्याधरांना जिंकले. एवढे त्याचे जयवर्णन येथे पुरे आहे ॥ ७३ ॥
___ या पर्वतावरील गुहा अंधाराने रहित करून जय प्राप्त करून देणाऱ्या साधनानीसैन्यानी ती गुहा ओलांडली आणि चक्रवर्तीने विजयार्धपर्वताच्या उत्तरश्रेणीच्या पृथ्वीवर प्रवेश केला ।। ७४ ॥
सेनापतीने जयसाधक सैन्याच्या द्वारे म्लेच्छराजांना जिंकले आणि नाखुष असलेल्या त्यांच्यावर भरतराजाची आज्ञा लादली व जबरदस्तीने त्यांचे धन हरण करून त्यांच्यावर विजय मिळविला ॥ ७५ ॥
त्यावेळी श्रेष्ठदर्जाच्या देवानी जवळ येऊन या भरतेशाचा अभिषेक केला. या विजयार्धमहापर्वताच्या अनेक शिखरावर भरतेशाचे यश स्थलकमलाप्रमाणे शोभत आहे ॥७६॥
या भरतेश्वराची गंगा आणि सिंधु या दोन देवतांनी रत्नांचे अर्घ्य अर्पण करून पूजा केली व या चक्रवर्तीने वृषभ पर्वताच्या तटावर आपले यश टाकीने कोरून ठेवले आहे ॥ ७७ ॥
या चक्रेश्वराने लक्ष्मीला घटदासी-घागरीने पाणी भरणारी दासी केले आहे आणि देव त्याचे सेवक झाले आहेत. जो सर्व रत्नांचा स्वामी आहे अशा त्याला नऊ निधि नेहमी घन देत असतात ॥ ७८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org