Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९२)
महापुराण
(३५-७९
स यस्य जयसैन्यानि निजित्य निखिला दिशः । भ्रमन्ति स्माखिलाम्भोधितटान्तवनभूमिषु ॥ ७९ त्वामायुष्मन् जगन्मान्यो मानयन्कुशलाशिषा । समादिशति चक्राडका प्रथयन्नधिराजताम् ॥ ८० मदीयं राज्यमाकान्तनिखिलद्वीपसागरम् । राजतेऽस्मप्रियभ्रात्रा न बाहुबलिना विना ॥ ८१ ताः सम्पदस्तदैश्वयं ते भोगाः स परिच्छदः । ये समं बन्धुभिर्भुक्ताः संविभक्तसुखोदयैः ॥ ८२ अन्यच्च नमिताशेषनृसुरासुरखेचरम् । नाधिराज्यं विभात्यस्य प्रणामविमुखे त्वयि ॥ ८३ न दुनोति मनस्तीवं रिपुरप्रणतस्तथा । बन्धुरप्रणमन्गर्यो दुर्विदग्धो यथा प्रभुम् ॥ ८४ तदुपेत्य प्रणामेन पूज्यतां प्रभुरक्षमी । प्रभुप्रणतिरेवेष्टा प्रसूतिर्नन सम्पदाम् ।। ८५ अवन्ध्यशासनस्यास्य शासनं ये विमन्वते । शासनं द्विषतां तेषां चक्रमप्रतिशासनम् ॥ ८६
....................
या राजेश्वराच्या सैन्यानी सर्व दिशा जिंकल्या आहेत व त्यानी सर्वसमुद्रांच्या तटावर असलेल्या वनभूमीवर विहार केला आहे ॥ ७९ ॥
हे आयुष्मन्ता-हे दीर्घायुषी प्रभो, सर्व विश्वमान्य असलेला तो आमचा प्रभु कल्याणदायक आशीर्वादाने आपला सत्कार करीत आहे व सर्वमान्य आणि चक्रायुध हेच ज्याचे चिह्न आहे असा तो आपल्या सर्वश्रेष्ठ राजेपणास-चक्रवर्तीपणास प्रसिद्ध करून आपणास आज्ञा देत आहे ।। ८० ।।
माझे राज्य सर्व द्वीप आणि समुद्र याना व्यापून पसरलेले आहे. पण त्याला माझ्या प्रिय भाऊ बाहुबलीवाचून शोभा नाही ।। ८१ ।।
__ आपले सुख व उत्कर्षाची विभागणी ज्याच्याशी झाली आहे अशा आपल्या भावासह ज्या भोगल्या जातात त्याच संपत्ति होत. तेच ऐश्वर्य, तेच भोग व तोच परिवार योग्य होय ॥ ८२॥
दुसरे असे आहे की, हे प्रभो, आपण जर या चक्रवर्तीला नमस्कार करणार नाही तर सर्व मानव, देव, असुर आणि विद्याधराना ज्याने नम्र केले आहे असे या चक्रवर्तीचे राज्य मुळीच शोभणार नाही ॥ ८३ ॥
गर्विष्ठ व आपणास शहाणा समजणारा असा भाऊ जर राजाला नम्र होणार नाही तर त्या राजाचे मनाला. त्याने नमस्कार न करणाऱ्या शत्रूपेक्षाही अतिशय दुःखविले असे होईल ॥८४॥
यास्तव क्षमा न करणाऱ्या या राजाकडे येऊन आपण नमस्कार करून त्याचा आदर करा व प्रभूला नमस्कार करणे हेच सर्वाना आवडणारे आहे व हा प्रभुनमस्कार सम्पत्तीना जन्म देणारा आहे ।। ८५ ।।
हे प्रभो, ज्याचे शासन निष्फळ नाही अशा या आमच्या राजाचे शासन ज मानीत नाहीत त्या शत्रूना हे चक्ररत्न शासन करणारे आहे ।। ८६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org