Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-१०८)
महापुराण
(२९५
उपप्रदानमप्येवम्प्रायं मन्ये महौजसि । समित्सहस्रदानेऽपि दीप्तस्याग्नेः कुतः शमः ॥ १०१ लोहस्येवोपतप्तस्य मृदुता न मनस्विनः । दण्डोऽप्यनुनयग्राह्ये सामजे न मृगद्विषि ॥ १०२ ततो व्यत्यासयन्नेतानुपायाननुपायवित् । स्वयं प्रयोगवैगुण्यात्सीदत्येव भवादृशः ॥ १०३ - साम्नापि दुष्करं साध्या वयमित्युपसंहृते । तत्रोत्सेकं प्रयुञ्जानो व्यक्तं मुग्धायते भवान् ॥ १०४ वयसाधिक इत्येव न श्लाघ्यो भरताधिपः । जरन्नपि गजः कक्षां गाहते कि हरेः शिशोः ॥ १०५ प्रणयः प्रश्रयश्चेति सङ्गतेषु सनाभिषु । तेष्वेवासङ्गतेष्वङ्ग तवयस्य हता गतिः॥ १०६ ज्येष्ठः प्रणम्य इत्येतत्काममस्त्वन्यदा सदा । मूर्ध्यारोपितखड्गस्य प्रणाम इति कः क्रमः ॥१०७ दूत दूनायते चित्तमन्योत्सेकानुवर्तनः । तेजस्वी भानुरेवैकः किमन्योऽप्यस्त्यतः परम् ॥ १०८
एखाद्या महान् तेजस्वी शत्रूला शान्त करण्यासाठी काही धनदान करणे देखिल वरीलप्रमाणेच शान्तीला कारण होत नाही. कारण पेटलेल्या अग्नीत हजारो समिधा टाकल्या तरीही त्याची शांति होणार नाहीच ॥ १०१ ॥
तापलेल्या लोखंडावर दण्ड-प्रयोग केला तरीही त्याच्यात मृदुता-मऊपणा उत्पन्न होत नाही तसे अभिमानी मनुष्यावर दमनाचा उपयोग होत नाही. कारण हा दण्डप्रयोग विनय करून शान्त करण्यास योग्य अशा हत्तीवर दण्डप्रयोग करणे योग्य आहे पण त्याचा उपयोग सिंहावर करणे निरुपयोगी आहे ॥ १०२ ॥
या सामादिक उपायाना कोठे योजावे याचे ज्ञान ज्याला नाही असा तुझ्यासारखा मनुष्य भलत्याच ठिकाणी याची योजना करतो त्यामुळे उपायात विगुणपणा येतो आणि त्यामुळे स्वतःच दुःखी होतो ॥ १०३ ॥
हे दूता आम्ही सामोपायाने देखिल वश होणार नाही असे जाणूनही तू अहंकाराने त्याचा प्रयोग करीत आहेस त्याअर्थी तू स्पष्ट मूर्ख आहेस असे वाटते ॥ १०४ ॥
भरतखण्डाचा स्वामी भरत वयाने अधिक आहे म्हणून तो आम्हास पूज्य आहे असे समजू नकोस. हत्ती जरी वृद्ध झाला तरीही तो सिंहाच्या बच्चाची बरोबरी करू शकतो काय? ॥ १०५ ॥
प्रेम आणि विजय हे दोन गुण जरी पस्परावर प्रेम करणाऱ्या भावात संभवतात. पण तेच जर मिळूनमिसळून वागत नसतील तर त्या प्रेमाची व विनयाचीही प्रवृत्ति नष्ट होते ॥१०६।।
ज्येष्ठ भाऊ हा नेहमी नमस्कार करण्याला योग्य आहे ही गोष्ट इतर वेळी आम्हाला नेहमी मान्य आहे. पण ज्याने आमच्या मस्तकावर तरवार ठेविली आहे त्याला नमस्कार. करावा ही रीत कोठली ? ॥ १०७ ।।
हे दूता दुसन्याच्या गर्विष्ठपणाला अनुसरून वागण्याने आमच्या मनाला फार दुःख होते. जगात सूर्य हाच एक तेजस्वी आहे. त्याच्या वाचून दुसरा कोणी मोठा तेजस्वी आहे काय ? ॥ १०८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org