Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-१२५)
महापुराण
(२९७
मुनयोऽपि समानाश्चेत्त्यक्तभोगपरिच्छदाः । को नाम राज्यभोगार्थो पुमानुज्झेत्समानताम् ॥ ११७ वरं वनाधिवासोऽपि वरं प्राणविसर्जनम् । कुलाभिमानिनः पुंसो न पराज्ञाविधेयता ॥ ११८ मानमेवाभिरक्षन्तु धीराः प्राणः प्रणश्वरैः । नन्वलडकुरुते विश्वं शश्वन्मानाजितं यशः ॥ ११९ । चार चक्रधरस्यायं त्वयात्युक्तः पराक्रमः । कुतो यतोऽर्थवादोऽयं स्तुतिनिन्दापरायणः ॥ १२० वचोभिः पोषयन्त्येव पण्डिताः परिफल्म्वपि । प्रक्रान्तायां स्तुताविष्टः सिंहो प्राममगो ननु ॥ १२१ इवं वाचनिकं कृत्स्नं त्वदुक्तं प्रतिभाति नः । क्वास्य दिग्विजयारम्भः क्व धनोञ्छनचञ्चुता ॥ दषच्चाक्रधरी वृत्ति बलि भिक्षामिवाहरन् । दीनतायाः परां कोटि प्रभुरारोपितस्त्वया ॥ १२३ सत्यं विग्विजये चक्री जितवानमरानिति । प्रत्येयमिदमेतत्तु चिन्त्यमत्र ननु स्वया ॥ १२४ स किं न वर्भशय्यायां सुप्तो नोपोषितोऽथवा । प्रवृत्तो जलमायायां शरपातं समाचरन् ॥ १२५ ।
__ ज्यानी सुखभोगास साधन असलेली अशी घर धनादि सामग्री त्यागली आहे असे मुनि देखिल समान-साभिमान असतात. तर मग राज्यभोगाची इच्छा करणारा कोणता मनुष्य साभिमानपणा सोडील बरे ? ॥ ११७ ॥
हे दूता, वनात राहणे ही बरेच आहे व प्राणत्याग करणेही बरे आहे. परंतु आपल्या कुलाचा अभिमान ज्याला आहे अशा मनुष्याने दुसऱ्याच्या हुकुमतीखाली राहणे बरे नाही ।। ११८ ॥
. जे धीरपुरुष असतात ते आपल्या नश्वर प्राणानी आपल्या अभिमानाचे रक्षण करतात. कारण अभिमानाने मिळविलेले त्यांचे यश सर्व जगाला शोभविते ॥ ११९ ॥
हे दूता, तू जो चक्रवर्तीचा पराक्रम अतिशय वाढवून वर्णिलास हे फार चांगले काम केलेस. कारण हे सर्व तुझे वर्णन स्तुतिरूप असून निन्देला सूचित करीत आहे ॥ १२० ।।
जे पंडित असतात ते आपल्या वचनानी अतिशय तुच्छ वस्तु फुगवून सांगतात. स्तुतीला प्रारंभ केल्यावर कुत्र्याला देखिल सिंह म्हणावे लागते ॥ १२१ ।।
हे दूता तू जे सर्व कार्याचे वर्णन केलेस ते सर्व केवळ वचनाडम्बर आहे असे आम्हाला वाटते. कारण या चक्रवर्तीचा दिग्विजयारम्भ कोणीकडे आणि द्रव्य गोळा करण्याचे याचे चातुर्य कोणीकडे ? अर्थात् हा दिग्विजयाला निघाला नसून धन गोळा करण्यासाठी निघाला असावा असे आम्हाला वाटते ।। १२२ ॥
__ चक्रवर्तीच्या आचाराला धारण करणारा व जणु भिक्षेप्रमाणे करभाग वसूल करणारा हा प्रभु तुजकडून दीनपणाच्या पराकाष्ठेप्रत पोचविला गेला आहे ।। १२३ ॥
हे दूता, दिग्विजयप्रसंगी चक्रीभरताने देवाना जिंकले असे म्हणणे खरे असले पाहिजे. परंतु हे सर्व खरे आहे काय याचा तू विचार कर ॥ १२४ ॥
हे दूता, जलमाया करून अर्थात् जलनिश्चल करून पाण्यात बाण सोडणारा असा तुझा प्रभु दर्भशय्येवर झोपला नाही काय ? किंवा उपोषणही त्याने केले नाही काय? ॥ १२५ ॥
म. ३८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org