Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९६)
महापुराण
(३५-१०९
राजोक्तिर्मयि तस्मिश्च संविभक्तादिवेधसा । राजराजः स इत्यद्य स्फोटो गण्डस्य मूर्धनि १०९ कामं स राजराजोऽस्तु रत्नर्यातोऽतिगृध्नुताम् । वयं राजान इत्येव सौराज्ये स्वे व्यवस्थिताः ॥११० बालानिव च्छलादस्मानाहूय प्रणमय्य च । पिण्डीखण्ड इवाभाति महीखण्डस्तदर्पितः ॥ १११ स्वदोन॒मफलं श्लाघ्यं यत्किञ्चन मनस्विनाम् । न चातुरन्तमप्यश्यं परभ्रूलतिकाफलम् ॥ ११२ पराज्ञोपहतां लक्ष्मी यो वाञ्छेत्पार्थिवोऽपि सन् । सोऽपार्थयति तामुक्ति सोक्तिमिव डुण्डुभः।।११३ परावमानमलिनां भूति धत्ते नपोऽपि यः। नपशोस्तस्य नन्वेष भारो राज्यपरिच्छदः ॥ ११४ मानभङ्गाजित गर्यः प्राणान्धर्तुमीहते । तस्य भग्नरदस्येव द्विरदस्य कुतो भिदा ॥ ११५ छत्रभङ्गाद्विनाप्यस्य छायाभङ्गोऽभिलक्ष्यते । यो मानभङ्गभारेण विभय॑वनतं शिरः॥ ११६
आदिब्रह्मा श्रीवृषभनाथानी राजा हा शब्द. माझ्या ठिकाणी व त्या भरताच्या ठिकाणी विभागलेला आहे असे असून तो भरत राजाधिराज आहे असे म्हणणे हे गालावर उठलेल्या फोडाप्रमाणे आहे ॥ १०९ ॥
तो भरत रत्नांच्या प्राप्तीमुळे अतिशय लोभी झाला आहे म्हणून तो खुशाल राजाधिराज होवो. आम्ही आपल्या उत्तम धर्मराज्यात सुखाने राहिलेले केवळ राजे आहोत ॥ ११०॥
बालकाप्रमाणे काही निमित्ताने आम्हास बोलावून आणि आपल्या पुढे आम्हाला नम्र करून काही पृथ्वीचा अंश देण्याची इच्छा . करीत आहे तर तो पृथ्वीचा विभाग आम्हाला पेंडीच्या खाड्याप्रमाणे वाटतो ।। १११॥
स्वतःच्या बाहुरूपी वृक्षाचे फल मग ते छोटे का असेना तेजस्वी व्यक्तीला ते प्रशंसनीय वाटते. पण दुसऱ्याच्या भुवयारूपी वेलीचे जणु चार दिशांच्या अन्तापर्यंत जें पृथ्वीरूपी फल त्याचा स्वामीपणा प्राप्त झाला तरी तो बरा वाटत नाही ।। ११२ ।।
जसे निविषसर्प ‘सर्प सर्प' या शब्दास व्यर्थ धारण करितो अर्थ रहित धारण करितो. तसे जो मनुष्य राजा असूनही दुसऱ्याच्या आशेच्या अधीन झालेल्या लक्ष्मीला धारण करीत आहे तो पार्थिव-राजा असूनही आपल्या 'पार्थिव' या शब्दाला व्यर्थता आणित आहे ।। ११३।।
___जो मनुष्य राजा होऊन देखिल दुसऱ्याने केलेल्या अपमानामुळे निस्तेज झालेल्या विभूतीला-संपत्तीला धारण करीत आहे त्या मनुष्यपशूला राज्यरूप सर्वसामग्री ओझ्यासारखीच आहे ।। ११४ ॥
मानभंग सहन करून मिळविलेल्या राज्यादिक भोगानी जो मनुष्य प्राण धारण करण्याची इच्छा करितो, तो ज्याचे दात तुटले आहेत अशा हत्तीसारखाच होय. त्याच्यापासून तो मनुष्य भिन्न कसा समजावा. अर्थात् भग्नमान मनुष्य दांत तुटलेल्या हत्तीप्रमाणे होय ॥११५।।
जो मानभंगाच्या भाराने नम्र झालेले मस्तक धारण करितो त्याचा छत्रभंग-छत्रनाश झाला नाही तरीही त्याच्या छायेचा नाश दृष्टीस पडतो. तात्पर्य- छाया शब्दाचे दोन अर्थ आहेत सावली आणि कान्ति. छत्रभंग न होताही सावलीचा नाश झाला हा विरोध आहे. तो विरोध छाया शब्दाचा अर्थ कान्ति हा घेतला म्हणजे नाहीसा होतो. अर्थात छत्रभंग न होताही मानभंग झाल्यामुळे मुखकान्ति नष्ट होऊन तो मनुष्य निस्तेज दिसतो ॥११६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org