________________
२९० )
( ३५-६३
त्वद्वचः सम्मुखीनेऽस्मिन्कार्यं सुव्यक्तमीक्ष्यते । असंस्कृतोऽपि यत्रार्थं प्रत्यक्षयति मादृशः ॥ ६३ वयं वचोहरा नाथ, प्रभोः शासनहारिणः । गुणदोषविचारेषु मन्दास्तच्छन्दचारिणः ॥ ६४ ततश्चक्रधरेणार्य यदादिष्टं प्रियोचितम् । प्रयोक्तृगौरवादेव तद्ग्राह्यं साध्वसाधु वा ॥ ६५ गुरोर्वचनमादेयमविकल्प्येति या श्रुतिः । तत्प्रामाण्यादमुष्याज्ञा संविधेया त्वयाधुना ॥ ६६ ऐक्ष्वाकः प्रथमो राज्ञां भरतो भवदग्रजः । परिक्रान्ता मही कृत्स्ना येन नामयतामरान् ॥ ६७ गंगाद्वारं समुल्लङध्य यो रथेनाप्रतिष्कशः । चलदाविद्धकल्लोलमकरोन्मकरालयम् ॥ ६८ शरव्याजः प्रतापाग्निर्ज्वलत्यस्य जलेऽम्बुधेः । पपौ न केवलं वाद्धि मानं च त्रिदिवौकसाम् ॥ ६९ मा नाम प्रणति यस्य व्राजिषुर्द्युसद : कथम् । आकृष्टाः शरपाशेन प्राध्वङ्कृत्य गले बलात् ॥ ७०
महापुराण
हे प्रभो, आपल्या वचनरूपी दर्पणात सर्व कार्य अगदी स्पष्ट दिसत आहे. कारण या वचनरूपी दर्पणात माझ्यासारखा विद्यासंस्काररहित अर्थात् अडाणी मनुष्य देखिल सर्व वस्तु प्रत्यक्ष बघत आहे ॥ ६३ ॥
हे प्रभो, आम्ही दूतलोक मालकाची आज्ञा कळविणारे आहोत व मालकाच्या छंदाप्रमाणे वागणारे आहोत. त्यामुळे गुण व दोषांचा विचार करण्यात आम्ही मंद आहोतअज्ञ आहोत ॥ ६४॥
यास्तव हे आर्य, चक्रपति भरतेश्वराने प्रिय व योग्य असे सांगितले आहे तें चांगले असो अथवा वाईट असो, सांगणाऱ्याच्या मोठेपणाकडे लक्ष देऊन त्याचा आपण स्वीकार करावा ॥ ६५ ॥
जे गुरूचे - वडिलांचे वचन आहे ते कांहीं मनामध्ये संशयादिक न येऊ देता ग्रहण करावे असे श्रुतिवचन आहे. त्या वचनाला प्रमाण मानून या वडील भावाची - भरतेश्वराची आज्ञा आपण मानणे योग्य आहे, तिला आपण अनुसरावे ।। ६६ ॥
आपले वडिलबंधु भरत हे इक्ष्वाकुवंशात उत्पन्न झाले आहेत. सर्व राजात ते श्रेष्ठ आहेत व पहिले आहेत. त्यानी सर्व अमराना नम्र केले आहे व पृथ्वी आपल्या आज्ञाधीन केली आहे ।। ६७ ।।
या भरतेश्वराने गंगाद्वाराला उल्लंघून कोणाचे साहाय्य न घेता ज्याच्या चंचल लाटा एकमेकावर आपटत आहेत अशा समुद्रात रथाने प्रवेश केला ॥ ६८ ॥
बाणाच्या मिषाने याचा प्रतापरूपी अग्नि समुद्राच्या पाण्यात देखिल प्रज्वलित झाला आहे व त्याने समुद्रच पिऊन टाकला आहे असे नाही तर त्याने देवांच्या अभिमानालाही पिऊन टाकले आहे ॥ ६९ ॥
या भरतेश्वराने बाणांच्या पाशाने गळा बांधून बलात्काराने देवाना देखिल ओढले आहे. असे जर आहे तर ते देव या भरतेश्वराला कसे बरे नमस्कार करणार नाहीत ? अवश्य करतील ॥ ७० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org