Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-६२)
महापुराण
(२८९
तमित्यालोकयन्दूराद्धाम्नः पुञ्जमिवोच्छिखम् । चचाल प्रणिधिः किञ्चित्प्रणिधानान्निधीशितुः॥५५ प्रणमंश्चरणावेत्य दधदूराननं शिरः । ससत्कारं कुमारेण नातिदूरे न्यवेशि सः ॥ ५६ तं शासनहरं जिष्णोनिविष्टमुचितासने । कुमारो निजगादेति स्मितांशन्विष्वगाकिरन ॥ ५७ चिराच्चक्रधरस्याद्य वयं चिन्त्यत्वमागताः । भद्र भद्रं जगद्धतुर्बहुचिन्त्यस्य चक्रिणः॥५८ विश्वक्षन्त्रजयोद्योगमद्यापि न समापयत् । स कच्चिद्भभुजां भर्तुः कुशली दक्षिणो भुजः ॥ ५९ श्रुता विश्वदिशः सिद्धा जिताश्च निखिला नृपाः । कर्तव्यशेषमस्यास्ति किमस्य वद नास्ति वा ॥६० इति प्रशान्तमोजस्वि वचः सारं मिताक्षरम । वदन कुमारी दूतस्य वचनावसरं व्यधात ॥ अथोपचक्रमे वक्तुं वचो हारि वचोहरः । वागर्थाविव सम्पिण्ड्य दर्शयन्दशनांशुभिः ॥ ६२
__ज्याच्या ज्वाला वर जात आहेत अशा तेजाचा जणु पुंज की काय अशा त्या बाहुबली राजाला त्या दूताने दुरून पाहिले व तो क्षणपर्यन्त भरतराजाने सांगितलेल्या विचारसरणीपासून - चलित झाला. त्याच्याशी कोणत्या विषयाची वाटाघाट करावयाची हे क्षणपर्यन्त विसरून गेला ।। ५५ ।।
दुरूनच मस्तक नम्र करणान्या त्या दूताने जवळ येऊन त्याच्या चरणाना नमस्कार केला. तेव्हां भुजबलिकुमाराने सत्कारपूर्वक त्याला फार दूर नाही असे आपल्याजवळ बसविले ॥ ५६ ॥
जयशील भरतचक्रीच्या त्या दूताला कुमाराने योग्य आसनावर बसविले. यानंतर आपल्या हास्यांच्या किरणाना चोहीकडे पसरून प्रभु भुजबली याप्रमाणे बोलला ॥ ५७ ॥
पुष्कळ वर्षानी चक्रवर्ती भरताच्या स्मरणाचा विषय आम्ही आज बनलो आहोत, सगळ्या जगावर चक्रवर्तीचे प्रभुत्व असल्यामुळे त्याला पुष्कळांचे चिन्तन करावे लागते. अशा त्याचे कुशल आहे ना ? ॥ ५८ ।।
जगातील सगळ्या क्षत्रियांना जिंकण्याचा उद्योग अद्यापि समाप्त न करणा-या त्या चक्रवर्तीचा उजवा बाहु खुशाल आहे ना ? ॥ ५९॥
सर्व दिशा चक्रवर्तीच्या ताब्यात आल्या आहेत असे आम्ही ऐकिले आहे आणि सर्व राजांनाही त्याने जिंकले आहे असे आम्ही ऐकिले आहे. आता याचे कांहीं कर्तव्य बाकी राहिले आहे किंवा नाही हे सांग बरे ? ॥ ६० ॥
याप्रमाणे शान्त, तेजस्वी, अल्पाक्षरयुक्त आणि सारयुक्त भाषण बाहुबली कुमाराने करून नंतर दूताला बोलण्यास अवसर दिला ॥ ६१ ॥
यानन्तर शब्द आणि अर्थ यांना एकत्र जुळवून आपल्या दाताच्या किरणानी प्रकाशित करून तो दूत मनाला आकर्षित करणारे असे भाषण याप्रमाणे बोलला ।। ६२ ।। म.३७
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org