Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-४७)
महापुराण
(२८७
उपशल्यभुवः कुल्याप्रणालीप्रसृतोदकाः । शालीाजीरकक्षेत्रवृतास्तस्य मनोऽहरन् ॥ ४० वापीकूपतडागैश्च सारामैरम्बुजाकरः । पुरस्यास्य बहिर्देशास्तेनादृश्यन्त हारिणः ॥ ४१ पुरगोपुरमुल्लङ्घ्य स निचायन्वणिक्पथान् । तत्र पुंजीकृतान्मेने रत्नराशीनिधीनिव ॥ ४२ नपोपायनवाजीभलालामदजलाविलम् । कृतच्छटमिवालोक्य सोऽभ्यनन्दन्नुपाङ्गणम् ॥ ४३ स निवेदितवृत्तान्तो महादौवारपालकः । नपं नृपासनासीनमुपासीवचोहरः ॥ ४४ पृथुवक्षस्तटं तुङ्ग मुकुटोदनशृङ्गकम् । जयलक्ष्मीविलासिन्याः क्रीडाशैलमिबंककम् ॥ ४५ ललाटपट्टमारूढपट्टबन्धं सुविस्तृतम् । जयश्रिय इवोद्वाहपढें दधतमुच्चकः ॥ ४६ वधानं तुलिताशेषराजन्यकयशोधनम् । तुलादण्डमिवोदूढभूभारं भुजदण्डकम् ॥.४७
पाट आणि पन्हाळे यांच्याद्वारे जेथे पाणी पसरले आहे व साळी, ऊस व जिरे यांच्या शेतानी व्यापलेले प्रदेश या नगराच्या सभोवती होते व त्यानी या दूताच्या मनाला आपल्याकडे आकर्षिले होते ॥ ४० ॥
या नगराच्या बाहेरील प्रदेश विहिरी, आडे आणि तळी व बगीचे यानी फार सुंदर दिसत होते. तळी कमळांच्या समूहानी शोभत होती. याप्रमाणे या प्रदेशानी त्या दूताचे मन आनंदित झाले ॥ ४१ ॥
तो दूत पोदनपुर नगराची वेस ओलांडून नगरात आल्यावर त्याला बाजाराचा मार्ग दिसला. तेथे त्याला रत्नांच्या राशि जणु निधि आहेत असे वाटले ।। ४२ ।।
तेथून तो पुढे राजवाड्याकडे आला. तेव्हा त्याचे अङ्गण त्याला दिसले. बाहुबली राजाला नजराणा देण्याकरिता इतर राजानी आणलेले जे घोडे व हत्ती त्यांच्या लाळेने व मदजलाने ते भिजलेले अंगण सडा टाकल्यासारखे दिसू लागले. ते पाहून त्या दूताला फार आनन्द वाटला ॥ ४३ ॥
त्या वार्ताहराने जेव्हा आपली सर्व हकीकत सांगितली तेव्हा मुख्य द्वारपालानी ती सर्व हकीकत बाहुबली राजाला कळविली. यानंतर राजसिंहासनावर बसलेल्या बाहुबली राजाकडे तो दूत आला ॥ ४४ ॥
या बाहुबलीची छाती विस्तृत होती व याचा मुकुट उंच शिखराप्रमाणे दिसत असल्यामुळे हा जयलक्ष्मीरूपी स्त्रीचा क्रीडा करण्याचा जणु एक अद्वितीय पर्वत आहे असा शोभत आहे ॥ ४५ ॥
___ या बाहुबलीचे विस्तृत असे कपाळ राज्यपट्टाने युक्त असल्यामुळे ते जणु विजयश्रीच्या विवाहपट्टाला धारण करीत आहे असे दिसत आहे ॥ ४६ ॥
याचे दोन भुजदण्ड हे तराजूच्या दण्डाप्रमाणे विस्तृत दीर्घ होते, या भुजदंडानी त्याने सर्व राजांचे यशोधन तोलले होते आणि सर्व पृथ्वीचा भार धारण केला होता ॥ ४७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org