Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-३१)
महापुराण
(२८५
सन्धि च पणबन्धं च कुर्यात्सोऽन्तरमेव नः । विक्रम्य क्षिप्रमेष्यामि विजिगीषावसङ्गते ॥ २४ गुणयन्निति सम्पत्तिविपत्ती स्वान्यपक्षयोः । स्वयं निगढ़मन्त्रत्वादनिर्भेद्योऽन्यमन्त्रिभिः ॥ २५ मन्त्रभेदभयाद्गूढं स्वपन्नेकः प्रयाणके । युद्धापसारभूमीश्च स पश्यन् दूरमत्यगात् ॥ २६ क्रमेण देशान्सिन्धश्च देशसन्धींश्च सोऽतियन् । प्रापत्सडख्यांतरात्रैस्तत्पुरं पोदनसाह्वयम् ॥२७ बहिः पुरमथासाद्य रम्याः सस्यवतीर्भुवः । पक्वशालिवनोद्देशान्स पश्यन्प्राप नन्वथुम् ॥ २८ पश्यन्स्तम्बकरिस्तम्बान्प्रसूतफलशालिनः । कृतरक्षाजनैर्यत्नात्स मेने स्वाथिनं जनम् ॥ २९ स कुटुम्बिभिरुद्दात्रैर्नृत्यद्भिरभिनन्दितान् । केदारलावसङ्घर्षतूर्यघोषान्न्यशामयत् ॥ ३० क्वचिच्छुकमुखाकृष्टकणाः कणिशमञ्जरीः । शालिवप्रेषु सोऽपश्यद्विटैर्भुक्ता इव स्त्रियः ॥ ३१ .
व तो संधि करण्याची भाषा बोलेल व पणबंध-कांही भेट राजा भरताला देण्याची भाषा जर करील तर ते मी माझ्या मनातलेच बोलत आहे असे समजून मी ते मान्य करीन आणि जर तो भरतराजाला मी जिंकीन अशी असंगत भाषा बोलेल तर मीही त्याच्याशी कांही पराक्रमाची भाषा बोलून लौकर भरतराजाकडे जाईन ।। २४ ॥
आपल्या पक्षाचा उत्कर्ष कसा होईल व शत्रुपक्षाची हानि कशी होईल तद्विषयक विचार करीत तो दूत चालला होता. तो दूत आपल्या विचाराना गुप्त ठेवणारा असल्यामुळे शत्रूच्या मंत्र्याकडून फोडला जात नव्हता ।। २५ ॥
जेथे जेथे मुक्काम होत असे तेथे तेथे आपला विचार फुटू नये म्हणून एकटाच तो झोपत असे व प्रयाण करताना युद्ध करण्याला कोणती भूमि व युद्धापासून निवृत्त होण्यास कोणती भूमि योग्य आहे हे पाहत तो फार दूर गेला ॥ २६ ॥
तो दूत क्रमाने अनेक देश व अनेक नद्या आणि अनेक देशांच्या सीमा उल्लंघून काही मोजक्या दिवस व रात्री व्यतीत करून पोदननगराला जाऊन पोहोचला ॥ २७ ॥
गावाच्या बाहेर अनेक धान्यानी सुंदर दिसणाऱ्या भूमि-शेते त्यानी पाहिली व पिकलेल्या साळीच्या शेताना पाहून तो दूत आनंदित झाला ॥ २८ ॥
ज्यांचे लोंबे बाहेर पडलेले असल्यामुळे जे शोभत आहेत व ज्यांचे शेतकरी यत्नाने रक्षण करीत आहेत, अशा साळीच्या धाटाना पाहणाऱ्या त्या दूताने सर्व लोक स्वार्थी आहेत असे मानले ।। २९ ॥
____ ज्यानी आपली खुरपी हातानी उंच धरली आहेत व जे आपल्या स्त्रियासह नाचत आहेत अशा शेतक-याना व शेत कापणीच्या वेळी होणान्या वाद्याच्या आवाजाप्रमाणे होणाऱ्या शब्दाना ऐकून त्याने मोठा आनंद मानला ॥ ३० ॥
त्या दूताने साळीच्या शेतात कोठे कोठे राघूनी-पोपटानी आपल्या मुखानी ज्यातील धान्यकण काढून खाल्ले आहेत अशा कणसांच्या मंजरीना पाहिले. त्या त्याला जारानी ज्यांचा उपभोग घेतला आहे अशा स्त्रियाप्रमाणे वाटल्या ।। ३१ ॥ .
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org