________________
( ३५-३२
सुगन्धिकलमामोदसंवादिश्वसितानिलैः । वासयन्तीदिशः शालिकणिशैरवतंसिताः ॥ ३२ पीनस्तनतटोत्सङ्गगलद्धर्माम्बुबिन्दुभिः । मुक्तालङ्कारजां लक्ष्मों घटयन्तीनिजोरसि ॥ ३३ सरसोऽब्जरजः कीर्ण सीमन्तरुचिरः कचैः । चूलामाबध्नतीः स्वैरग्रन्थितोत्पलवामकैः ॥ ३४ दधतीरातपक्लान्तमुख पर्यन्तसङगिनीः । लावण्यस्येव कणिकाः श्रमधर्माम्बुविप्रुषः ॥ ३५ शुकान् शुकच्छवच्छायैः रुचिराङ्गीः स्तनांशुकैः । छोत्कुर्वतीः कलक्वाणं सोऽपश्यच्छालिगोपिकाः ॥ भ्रमद्यन्त्रकुटीयन्त्रचीत्कारैरिक्षुवाटकान् । फूत्कुर्वत इवाद्राक्षीदतिपीडाभयेन सः ॥ ३७ उपक्षेत्रं च गोधेनूर्महोषोभारमन्थराः । वात्सकेनोत्सुकाः स्तन्यं क्षरतीनिचचाय सः ॥ ३८ इति रम्यान्पुरस्यास्य सीमान्तान्स विलोकयन् । मेने कृतार्थमात्मानं लब्धतद्दर्शनोत्सवम् ॥ ३९
२८६)
महापुराण
शेतक-याच्या स्त्रियांनी सुगन्धित साळीच्या सुवासासारख्या श्वासोच्छ्वासाच्या वायूनी दिशाना सुगन्धित केले होते व त्यानी साळीची लोंबे आपल्या कानावर धारण करून त्यांची शोभा वाढविली होती ॥ ३२ ॥
आपल्या पुष्ट स्तनांच्या तटावरून गळत असलेल्या घामांच्या जलबिन्दूंनी त्या स्त्रिया आपल्या छातीवर जणु त्यांच्या हाराची शोभा धारण करीत होत्या ॥ ३३ ॥
सरोवराच्या कमलांचा पराग त्यांच्या भांगांत पसरल्यामुळे सुंदर दिसणान्या केसानी त्यानी आपला बुचडा बांधला होता व त्याच्या सभोवती त्यानी कमळाच्या माळा बांधल्या होत्या ।। ३४ ।।
उन्हाने कोमजलेल्या त्यांच्या मुखाच्यासभोवती श्रमाने घामाचे जलबिंदु जमलेले होते. जणु सौंदर्य रसाचे कण त्यांच्या मुखाच्या सभोवती पसरल्याप्रमाणे वाटत होते ।। ३५ ।।
राधूंच्या पंखाप्रमाणे हिरवा रंग ज्यांचा आहे अशा चोळींनी त्यांचे अंग सुन्दर दिसत होते व त्या आपल्या मधुर शब्दांनी धान्य खाण्यासाठी आलेल्या राघूंना हाकून देत होत्या. अशा त्या शेतक-यांच्या स्त्रियाना त्याने पाहिले ।। ३६ ।।
फिरणाऱ्या घाण्याच्या शब्दानी आपणास होत असलेल्या पीडेच्या भयामुळे जणु ती उसांची शेते इवळतात की काय अशा त्यांना त्या दूताने पाहिले ॥ ३७ ॥
शेताच्याजवळ पुष्ट असलेल्या मोठ्या कासेच्या भाराने मंद चालणाऱ्या व वासराना पाहण्यासाठी उत्सुक झालेल्या आणि ज्यांच्या कासेतून दूध गळत आहे अशा नूतन प्रसूत झालेल्या गायी त्या दूताने पाहिल्या ॥ ३८ ॥
याप्रमाणे या नगराच्या सीमेवरील रम्य प्रदेशाना पाहून त्या दूताला मोठा आनंद वाटला आणि त्याने स्वतःला त्या प्रदेशाच्या अवलोकनाने कृतार्थ मानले ।। ३९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org