________________
२८८)
महापुराण
(३५-४८
मुखेन पडूजच्छायां नेत्राभ्यामुत्पलश्रियम् । दधानमप्यनासन्नविजातिमजलाशयम् ॥ ४८ बिभ्राणमतिविस्तीर्ण मनोवक्षश्च यद्वयम् । वाग्देवीकमलावत्योर्गतं नित्यावकाशताम् ॥ ४९ रक्षावृत्तिपरिक्षेपं गुणग्रामं महाफलम् । निवेशयन्तमात्माङ्गे मनः सु च महीयसाम् ॥ ५० स्फुरदाभरणोद्योतच्छद्मना निखिलादिशः । प्रतापज्वलनेनैव लिम्पन्तमलघीयसा ॥ ५१ मुखेन चन्द्रकान्तेन पद्मरागेण चारुणा। चरणेन विराजन्तं वज्रसारेण वर्मणा ॥ ५२ हरिन्मणिमयस्तम्भमिवकं हरितत्विषम् । लोकावष्टम्भमाधातुं सृष्टमायेन वेधसा ॥ ५३ सर्वाङ्गसग्छतं तेजो वधानं क्षात्रमूजितम् । नूनं तेजोमयैरेव घटितं परमाणुभिः ॥५४
या बाहुबलीने आपल्या मुखाने कमलाची व आपल्या दोन डोळ्यानी उत्पलाची-नीलकमलाची शोभा धारण केली होती. तरीही त्यांच्याजवळ विजाति-अर्थात् पक्ष्याच्या जाति नव्हत्या आणि ते जलाशय-तळे-सरोवर आदि नव्हते. या श्लोकात विरोधाभास अलंकार आहे. विजाति-या बाहुबलीजवळ संकरजन्य माणसे आश्रयाला नव्हती व पक्षीही नव्हते आणि बाहुबली हे अजडाशय-अजलाशय सरोवर तळे आदिक नव्हते व स्वतः अजडाशय-मूर्खपणाच्या अभिप्रायाने रहित होते ।। ४८ ॥
या बाहुबलीचे मन आणि वक्षस्थल अतिशय विस्तृत होते व त्यात नेहमी क्रमाने वाग्देवी-सरस्वती आणि कमलावती-लक्ष्मी या दोन देवता राहत असत ॥ ४९॥
प्रजांचे रक्षण करण्यास जे साधन आहेत आणि महाफले देणारे असे सद्गुणसमूह बाहबलीने आपल्या शरीरात धारण केले होते व त्याने महापुरुषांच्या अन्तःकरणातही ठेवले होते. याचे तात्पर्य असे- तो बाहुबली स्वतः सद्गुणी होता व लोकानाही त्यानी सद्गुणी केले होते ॥ ५० ॥
चमचमणाऱ्या अलंकारांच्या प्रकाशाच्या मिषाने जण आपल्या प्रतापरूपी अग्नीने याने सर्व दिशा व्याप्त केल्या होत्या ।। ५१ ।।
हा बाहुबली चंद्राप्रमाणे सुन्दर मुखाने, पद्मरागमण्याप्रमाणे लाल अशा पायानी वज्राप्रमाणे सामर्थ्य ज्यात आहे, कठिणपणा ज्यात आहे अशा आपल्या शरीराने शोभत होता ।। ५२ ॥
__ ज्याची कान्ति हिरवी आहे असा व जो पहिल्या ब्रह्मदेवाने-आदिभगवंताने सर्व जगाला सावरून धरण्याकरिता जणु उत्पन्न केलेला अद्वितीय पाचूरत्नांचा खांब आहे की काय असे पाहणाऱ्यास वाटत होते ।। ५३ ।।
याने आपल्या सर्व अंगात क्षत्रियांचे उत्कृष्ट तेज धारण केले होते. जणु हा बाहुबली तेजोमय परमाणूंनीच बनविला आहे असा दिसत होता ।। ५४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org