Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५-१६)
महापुराण
(२८३
सोऽयं भुजबली बाहुबलशाली मदोद्धतः । महानिव गजो माद्यन्दुग्रहोऽनुनयविना ॥९ न स सामान्यसन्देशः प्रतीभवति दुर्मदी । ग्रहो दुष्ट इवाविष्टो मन्त्रविद्याचर्णविना ॥ १० शेषक्षत्रिययूनां च तस्य चास्त्यन्तरं महत् । मृगसामान्यमानायतुं कि शक्यते हरिः ॥ ११ सोऽभेद्यो नीतिचञ्चत्वाइण्डसाध्यो न विक्रमी । नेष सामप्रयोगस्य विषयो विकृताशयः ॥ १२ ज्वलत्येव स तेजस्वी स्नेहेनोपकृतोऽपि सन् । घृताहुतिप्रसेकेन यथेद्धाचिर्मखानलः ॥ १३ । स्वभावपरुषे चास्मिन्प्रयुक्तं साम नार्थकृत् । वपुषि द्विरवस्येव योजितं त्वच्यमौषधम् ॥ १४ प्रायो व्याख्यात एवास्य भावः शेषैः कुमारकः । मदाज्ञाविमुखैस्त्यक्तराज्यभोगवनोन्मुखैः॥ १५ भूयोऽप्यनुनयरस्य परीक्षिष्यामहे मतम् । तथाप्यप्रणते तस्मिन्विधेयं चिन्त्यमुत्तरम् ॥ १६
___ असा तो हा भुजबली आपल्या भुजबलाने शोभत आहे व गर्वाने उद्धट झाला आहे. मत्त झालेल्या मोठ्या हत्तीप्रमाणे अनुनय केल्यावाचून मधुर भाषणादिकावाचून वश करणे शक्य नाही ॥ ९॥
तो मोठा अभिमानी असल्यामुळे सामान्य संदेश-निरोप पाठविण्याने नम्र होणार नाही. मन्त्रविद्येत अतिशय प्रवीण असलेल्या मांत्रिकाशिवाय जसे अंगात शिरलेले भूत वश होत नाही तसा हा बाहुबली सामान्य संदेशानी वश होणार नाही ॥ १० ॥
____ बाकीच्या तरुण क्षत्रियात व या बाहुबलींत मोठे अंतर आहे. कारण हरिण वगैरे सामान्य पशूना पकडण्यासाठी बनविलेल्या जाळयानी सिंहाला पकडणे कसे शक्य होईल ? ॥ ११॥
तो बाहुबली राजनीतीमध्ये चतुर असल्यामुळे त्याला फितुर करता येत नाही व पराक्रमी आहे म्हणन तो युद्धानेही वश होणार नाही व याचे विचार वक्र व विकारयुक्त असल्यामुळे. त्याच्याबरोबर शान्तीचाही विचार करणे योग्य होणार नाही ॥ १२ ॥
जसा यज्ञाचा अग्नि तुपाच्या आहुतीने अधिकच प्रज्वलित होतो तसा हा तेजस्वी बाहुबली स्नेहाने-प्रेमाने वश करण्याचा प्रयत्न केला तरीही अधिकच भडकत आहे, कोपयुक्त होत आहे ॥ १३ ॥
हा स्वभावाने कठोर असल्यामुळे सामोपाय करणेही उपयुक्त होणार नाही. हत्तीच्या शरीरावर मृदुपणा यावा म्हणून योजलेलें त्वचेवरचे औषध जसे व्यर्थ होते तसा सामोपाय व्यर्थ होईल ॥ १४ ॥
ज्यानी माझी आज्ञा नाही मानली व राज्यभोगांचा त्याग करून जे वनाकडे गेले अशा माझ्या इतर धाकट्या भावानी या बाहुबलीचा स्वभाव बहुतांशी स्पष्ट केला आहेच ॥ १५ ॥
जरी असे आहे तरीही कोमल भाषणादिकानी याच्या मताची आपण परीक्षा करू या. त्या उपायानीही हा जर नम्र झाला नाही तर याच्यावर काय करावे याचा विचार पुढे करणे योग्य होईल ॥ १६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org